Telangana Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: 'माझं दिपूवर खूप प्रेम असून आता मी...', पत्नी आणि २ मुलांना सोडून किन्नरसोबत राहू लागला तरुण

Telangana Police: किन्नरच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने आपली बायको आणि दोन मुलांना सोडून दिलं. हा तरुण या किन्नरसोबतच राहत आहे. या घटनेमुळे तेलंगणामध्ये खळबळ उडाली असन जोरदार चर्चा होत आहे.

Priya More

तेलंगणामध्ये भयंकर घटना घडली आहे. किन्नरच्या प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने आपली बायको आणि दोन मुलांना सोडून दिलं. हा तरूण सध्या किन्नरसोबत राहतो. ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे. 'मला दिपू खूप आवडतो आणि माझं तिच्यावर प्रेम आहे.', असं म्हणत या तरुणाने किन्नरकडेच राहण्याचा निर्णय घेतला.

तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात ही घटना घडली. याठिकाणी एक तरुण बायको आणि दोन मुलांना सोडून किन्नरसोबत राहत आहे. जगतियाल जिल्ह्यातल्या कस्बेमध्ये राहणाऱ्या बिंगी राजशेखरचे लग्न २०१४ मध्ये पेम्बटला गावातील लास्या नावाच्या तरुणीसोबत झाले होते. राजशेखरला दोन मुलं आहेत. दोघांचाही संसार चांगला सुरू होता. अशात राजशेखर हैदराबादमधील एका किन्नरच्या संपर्कात आला आणि त्याचा जीव या किन्नरवर जडला.

राजशेखर किन्नर दिपूच्या प्रेमात इतका वेडा झाला की त्याने आपली पत्नी लास्याला आणि दोन मुलांना सोडून दिलं. जेव्हा त्याची बायको लास्याला याची माहिती मिळाली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. मानसिक धक्का बसलेल्या लास्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. लास्याला रुग्णालयात दाखल केले याची माहिती सांगून देखील राजशेखर आपल्या बायकोला भेटायला आला नाही.

त्यानंतर राजशेखरच्या सासरची मंडळी चिंतेत आली. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी राजशेखरला किन्नर दिपूसोबत त्यांनी रंगेहाथ पकडले. त्यांनी राजशेखरला किन्नर दिपूच्या घरामध्येच पकडले. संतप्त झालेल्या राजशेखरच्या सासऱ्यांनी त्याला घरामध्ये कोंडून ठेवलं. त्याने त्यांना सांगितले की, 'माझं दिपूवर प्रेम आहे आणि यापुढे मी तिच्यासोबत इथेच राहणार आहे.' त्यानंतर लास्याच्या कुटुंबीयांनी राजशेखर आणि किन्नरविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT