
नराधम बापाला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय
पीडित मुलगी ही तिच्या आई-वडिलांसोबत उस तोडीसाठी गेली होती.
सरकार पक्षाच्या वतीने एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले.
स्वतःच्या पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी बलात्कार प्रकरणी निकाल दिला. या खटल्यात सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.
पीडित मुलगी ही तिच्या आई-वडिलांसोबत उस तोडीसाठी गेली होती. अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईसोबत ती दवाखान्यात गेली असताना डॉक्टरांनी सदर मुलगी गरोदर असल्याने सांगितले. त्यानंतर तिच्या आईने तिला विश्वासात घेवून विचारले असता, पीडित मुलीने सांगितले की, तिचा बाप आरोपी बाळू उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड हा गेल्या सात ते आठ महिन्यापासुन दारू पिवून तिच्यावर अत्याचार करत होता. उमराई येथील राहते घरी तिची आई घरी नसताना जबरदस्ती करून शारीरीक संबंध ठेवत होता. त्यातून मुलगी गरोदर राहिली होती.
पीडितेने दि. ०७-०२-२०२४ रोजी धारूर पोलीस स्टेनशमध्ये फिर्याद नोंदवली होती. या फिर्यादीवरून गुरनं क. २४/२०२४ कलम ३७६, ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (आय), ३७६ (२) (एन) भादंवी, ४ (२), ६ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पीएसआय प्रकाश शेळके यांनी करून न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात खटला सुरू होऊन सरकार पक्षाच्या वतीने एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यामध्ये त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई व डीएनए प्रोफाईल करणारा साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अॅड. लक्ष्मण फड यांनी भक्कमपणे बाजू मांडत आरोपीने हे कुकर्म केले आहे, हे सरकार पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध केले.
ही बाब न्यायालयाने निकालात नोंद केली. तसेच आरोपीने केलेले कृत्य हे अमानवी आहे. असा प्रकार एखाद्या दुर्मिळ प्रकरणात होतो. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाने मान्य करून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.