नेते मनोहर धाकड यांचा हायवेवरील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जयपूरमधील एका व्हिडिओनं इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. आलिशान ५ स्टार हॉटेलमधील खोलीत एक जोडपं आक्षेपार्ह स्थितीत कॅमेऱ्यात कैद झालं. शारीरिक संबंध ठेवत असताना कपलने पडदा लावले नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे हॉटेलच्या खिडकीतून कपल आक्षेपार्ह स्थितीत असल्याचं ठळकपणे दिसून येत आहे. व्हिडिओ काही सेकंदात सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओ १७ जून रोजी रात्रीच्या सुमारास शूट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये ५ स्टार हॉटेल दिसत आहे. हॉटेलच्या खोलीत एक जोडपं शारीरिक संबंध ठेवत होते. कदाचित त्यावेळी जोडपे पडदे लावायला विसरले असावे. हॉटेलच्या पुलासमोरून जात असताना काही लोकांनी पाहिलं. कपलला पाहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी जमली. काहींनी शूट करून व्हिडिओ शेअर केला.
व्हिडिओमध्ये काही लोक ओरडताना आणि अपशब्द वापरताना ऐकू येत आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले. तर काहींनी हॉटेल प्रशानाला दोषी ठरवलं. दरम्यान, या प्रकरणात जयपूर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. 'कुणाचे प्रायव्हेट क्षण शूट करून व्हायरल केल्यास, त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल ', असा इशारा जयपूर पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, हॉटेल व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जोडप्याची ओळख सध्या अज्ञात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.