Crime News Saam tv
देश विदेश

Shocking: शौचालयात बाळाला जन्म, कमोडमध्ये अर्भकाला टाकून फ्लश; आईचं भयंकर कृत्य

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये एका रुग्णालयाच्या शौचालयातील कमोडमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या स्त्री जातीच्या अर्भकाला कमोडमध्ये फेकून फ्लश करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary:

  • शौचालयातील कमोडमध्ये आढळले नवजात अर्भक

  • छिंदवाडा जिल्ह्यात रुग्णालयातील धक्कादायक घटना

  • मृतदेह बाहेर काढण्यासाठी टॉयलेट तोडावे लागले

  • पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू

  • पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरू

मानवतेला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. एका रुग्णालयाच्या शौचालयात मृत अर्भक आढळून आले. एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने स्त्री अर्भकाला कमोडमध्ये टाकले. कमोडमध्ये हे अर्भक अडकले होते. फ्लश केल्यानंतर बाळाचे हात आणि आणि डोकं दिसून आले त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर मृत अर्भकाला बाहेर काढण्यासाठी टॉयलेट तोडावे लागले.

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथे ही घटना घडली. रुग्णालयातील एक महिला कर्मचारी शौचालय स्वच्छ करण्यासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आली. या महिलेने शौचायल साफ करत असताना फ्लश केला. पण पाणी काही गेले नाही. कमोडमध्ये काही तरी अडकल्यासारखे तिला वाटले. त्यामुळे तिने वाकून पाहिले. तर आतमध्ये नवजात बाळाचे हात आणि डोकं दिसून आले. हे पाहून घाबरलेल्या महिलेने ताबडतोब रुग्णालय व्यवस्थापनाला कळवले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी रुग्णालयात पसरल आणि एकच खळबळ उडाली. रुग्णालय व्यवस्थापनाने ताबडतोब एएनसी, पीएनसी आणि प्रसूती कक्षांची तपासणी केली. पण नुकताच बाळंतपणाशिवाय प्रसूती झालेल्या कोणत्याही महिला आढळल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. दुपारी ४:३० च्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महानगरपालिका कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी आणि पोलिसांनी शौचालय तोडले. अर्भतकाचा मृतदेह कमोडमध्ये खोलवर रुतला अडकला होता आणि तो बाहेर काढण्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, गर्भवती महिला बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी रुग्णालयात आली असावी. तिने प्रसाधनगृहात बाळाला जन्म दिला आणि पुरावे लपवण्यासाठी नवजात अर्भकाला कमोडमध्ये टाकून फ्लश करण्याचा प्रयत्न केला. मुलगी जन्माला आली म्हणून महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याने हे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केवा. पोलिस सध्या रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT