Pune Crime News  Saam tv
देश विदेश

Crime News: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचा गर्भवती महिलेवर बलात्कार; ३ वर्षीय मुलासमोरचं केलं कृत्य

Police Constable Misconduct Crime News: पोलीस कॉन्स्टेबलनं तीन वर्षीय मुलासमोर त्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेच्या पतीनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे. पोलीस कॉन्स्टेबलनं तीन वर्षीय मुलासमोर त्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केला आहे. जेव्हा गर्भवती महिला विरोध करत होती, तेव्हा नराधमाने तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. ही संतापजनक घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडित महिलेच्या पतीनं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल केलाय.

जयपूरमध्ये महिला दिनी एक संतापजनक घटना घडली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलनं गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल महिलेची फिर्याद नोंदवण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यादरम्यान तिचा तीन वर्षांचा मुलगा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता.

आरोपी कॉन्स्टेबलनं त्यानंतर महिलेला एका हॉटेलमध्ये नेलं. तिला हॉटेलमध्ये नेत तिच्यावर जबरदस्ती केली. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करत असताना महिलेनं विरोध केला. त्यावेळेस कॉन्स्टेबलनं महिलेच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. नंतर पोलीस कॉन्स्टेबल तेथून पसार झाला.

पीडित महिला जेव्हा घरी गेली, तेव्हा तिनं आपल्या पतीला आपबिती सांगितली. महिलेच्या पतीनं थेट पोलीस ठाणे गाठात आरोपी कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल जयपूरमधील सांगानेर पोलीस ठाण्यात तैनात असून, आरोपीचा शोध पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Bihar Tourist: बिहारमधील टॉप १० ठिकाणे, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मनसे- मविआची युती झालीच, नाशिकच्या राजकारणात नवं समीकरण

SCROLL FOR NEXT