Pune political news: धंगेकरांनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का! बड्या नेत्यानं सोडली साथ, हजारो समर्थकांसह शिंदेसेनेत जाणार

Congress leader joins Eknath Shinde group: पुण्यातील कसबा पेठमधील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता काँग्रेसमधील बडा नेता हजारो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
Shinde Faction
Shinde FactionSaam Tv News
Published On

पुण्यातील कसबा पेठमधील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता काँग्रेसमधील बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी तयार आहे. काँग्रेस नेते भाऊराव पाटील गोरेगावकर काँग्रेसची साथ सोडणार असून, हजारो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. कुठे फोडाफोडीचं राजकारण तर, कुठे स्वेच्छेने पक्षप्रवेश सुरू आहे. अशातच काँग्रेसला मोठी गळती लागली असून, रविंद्र धंगेकर पाठोपाठ भाऊराव पाटील गोरेगावकरांनी देखील शिंदेंच्या शिवेसेनेची वाट धरली आहे.

Shinde Faction
Pune News: भरचौकात अश्लील चाळे करणारा गौरव रात्री काय करत होता? मद्यपान अन् ड्रग्जच्या आहारी गेला होता का?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाऊराव पाटील गोरेगावकर यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नव्हतं. त्यावेळी त्यांनी बंडखोरी करत लक्षेवधी मते घेतली होती. मात्र, पराभव झाल्यानं आगामी निवडणुकांची तयारी म्हणून त्यांनी काँग्रेसला रामराम करायचं ठरवलं. आता भाऊराव पाटील गोरेगावकर हजारो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.

Shinde Faction
Ladki Bahin Yojana: लाडकी बहि‍णींच्या खात्यात फक्त १५००? मार्चचा हप्ता कधी मिळणार?

रविंद्र धंगेकरांनी काँग्रेसची सोडली साथ

पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असून, धंगेकरांनी पत्रकार परिषदेत घेत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com