two minor girls found dead in SAI hostel Kerala : केरळमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वसतिगृहात प्रशिक्षणार्थी खेळाडू असलेल्या दोन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. १७ आणि १५ वर्षाच्या मुलींचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेनंतर केरळमधील क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आत्महत्या आहे की हत्या आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे.
केरळमधील कोल्लम येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआय) च्या वसतिगृहात गुरुवारी दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. सँड्रा आणि १५ वैष्णवी अशी मृत मुलींची नावे आहेत. सँड्रा ही मूळची कोझिकोड जिल्ह्यातील आहे, तर वैष्णवी ही तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१७ वर्षाची सँड्रा ही अॅथलेटिक्सची प्रशिक्षणार्थी होती. तर वैष्णवी कबड्डीपटू होती. दोघीही दहावीच्या विद्यार्थिनी होत्या. सकाळी दोघीही दररोजच्या सरावाला मैदानात आल्या नाहीत. त्यामुळे सहकारी खेळाडूंनी याबाबत हॉस्टेलमधील स्टाफला याबाबत माहिती दिली. वारंवार दार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला अन् त्यांच्या पायाखालची समीन सरकली. खोलीमध्ये दोन्ही मुलींनी छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. दरम्यान, वैष्णवी दुसऱ्या खोलीत राहत होती, परंतु त्या रात्री ती सँड्राच्या खोलीत आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
कोल्लम पूर्व पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दोन्ही मुलींच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. खोलीमधून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनीसांगितले. पोलिासांनी दोघींच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. हॉस्टेलमधील कर्मचारी आणि इतरांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.