24-Year-Old Delivery Agent Killed in Bengaluru Saam
देश विदेश

डिलिव्हरी बॉयकडून चारचाकीला धडक, जोडप्याला राग अनावर; तरूणाला चिरडलं, घटना CCTVत कैद

24-Year-Old Delivery Agent Killed in Bengaluru: बंगळुरूमधून धक्कादायक बातमी समोर. किरकोळ धडकेनंतर डिलिव्हरी बॉयची हत्या. जोडप्यानं चारचाकीतून डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला दिली धडक.

Bhagyashree Kamble

कर्नाटकची राजधानी बंगळूरूमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. २४ डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली. एका जोडप्यानं चारचाकीतून डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. तर, डिलिव्हरी बॉयच्या मागे बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा सोशल मीडियात व्हायरल झाला असून, जोडप्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्शन (वय वर्ष २४) असे मृत डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. २५ ऑक्टोबर रोजी नटराजा लेआउट परिसरात या तरूणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजेच्या सुमारास, केंबट्टाहल्ली येथील रहिवासी दर्शन त्याच्या मित्रासोबत ऑर्डर देण्यासाठी त्याच्या गियरलेस स्कूटरवरून गेला होता. त्याच्या स्कूटरने चुकून आरोपी मनोज कुमारच्या कारच्या उजव्या बाजूच्या आरशाला स्पर्श झाला आणि काच तुटली.

दर्शनने ताबडतोब माफी मागितली. नंतर मनोज कुमार आपली चारचाकी घेऊन निघून गेला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मनोजला राग अनावर झाला. त्यानं यू-टर्न घेतला. स्कूटरचा पाठलाग केला. सुमारे २ किलोमीटर अंतरावर श्री राम मंदिर परिसरात मागून धडक दिली. दुचाकीवरू दर्शनच्या माागे त्याचा मित्र वरूण बसला होता. दर्शनचा जागीच मृत्यू झाला. तर, मागे बसलेला वरूण गंभीर जखमी झाला.

स्थानिक रहिवाशांनी तातडीने दर्शन आणि वरूणला रूग्णालयात तातडीने नेले. तिथे डॉक्टरांनी दर्शनला मृत घोषित केले. सुरूवातीला दर्शनच्या बहिणीनं हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला. परंतु, नंतर हळूहळू या घटनेचे धागेदोरे उलगडले. घटना घडल्यानंतर मनोज ४० मिनिटानंतर तोंडाला मास्क लावून घटनास्थळी परतला. तसेच तुटलेली काच, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुट्टेनहल्ली पोलिसांनी या घटनेचा तपास करून तातडीने आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Maharashtra Live News Update: भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

Hair Care: तुमच्या केसांसाठी कोणता शॅम्पू आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Palak Pakoda Recipe: थंडीत संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाईल पालक भजी, ही आहे सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT