बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
सासरा आणि सुनेमधील अनैतिक संबंधातून घडली घटना
नवऱ्याने बायकोला विष देत केली आत्महत्या
नंतर सासरा आणि दिराचा देखील मृतदेह आढळून आला
बिहारच्या नालंदा जिल्ह्यात सासरा आणि सुनेच्या प्रेमसंबंधामुळे संपूर्ण कुटुंबाचा भयंकर शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. नवऱ्याने आधी बायकोला जबरदस्ती विष पाजून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: देखील विष प्यायलं. त्यानंतर घरामध्ये आरोपीच्या वडील आणि भावाच मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एका कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विशुनपुर गावात घडली. दिसचंद्र तांती (६२ वर्षे) याचे सून गौरी देवी (३० वर्षे) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा ही गोष्ट गौरीचा नवरा पुरूषोत्तम कुमारला माहिती पडली तेव्हा त्याला प्रचंड राग आला. यावरून त्याचे वडिलांसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने बायकोला विष पाजले आणि स्वत: देखील प्यायला.
मुलगा आणि सुनेला या अवस्थेत पाहून दिलचंद्र याच्या पायाखालची जमीन सरकरली. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आत्महत्या केली. तर दिलचंद्र यांचा दुसरा मुलगा रंजीत कुमार याचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य शेतात काम करत होते. मुलांनी धावत जाऊन कुटुंबातील इतरांना ही माहिती दिली त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली.
स्थानिकांच्या मदतीने चौघांनाही तातडीने चंडी रेफरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सासरे आणि सुनेला मृत घोषित केले. तर पुरुषोत्तम आणि रणजित या दोन भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनीही घटनेचा आढावा घेतला आणि गावकऱ्यांची चौकशी केली. पोलिस तपासातून असे समोर आले की, ही संपूर्ण घटना सासरा आणि सून यांच्यातील अनैतिक संबंधातून घडली होती. याच मुद्द्यावरून मुलाचा वडिलांशी वाद होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. इतर पैलूंचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.