family of four dies due to motorcycle AI
देश विदेश

बाईक रात्रभर सुरू ठेवली, घरात विष तयार झाले, ४ जणांचा गुदमरून मृत्यू, धक्कादायक घटनेनं राज्य हादरलं

Chittoor District family death case : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात रात्रभर सुरू ठेवलेल्या बाईकच्या धुरामुळे घरात विषारी हवा साठली आणि झोपेतच पती, पत्नी व दोन मुलांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

family of four dies due to motorcycle exhaust fumes in Chittoor : आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. भीषण अपघात अथवा आजारपण किंवा आत्महत्या केल्यामुळे नव्हे तर विषारी हवेमुळे गुदमरून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. बाईक रात्रभर सुरू ठेवल्यामुळे चौघांचाही झोपेतच मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. मेकॅनिकने बाईक सतत सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. नेमकी ही घटना काय आहे, याबाबत जाणून घेऊयात..

स्थानिक मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पुंगनूरच्या त्यागराजू स्ट्रीट परिसरात एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी अंत झाला. एका रहिवाशाच्या बाईकच्या इंजिन दुरुस्त करण्यात आले होते. मेकॅनिकने त्याला नवीन इंजिनचे भाग व्यवस्थित बसवले आहेत याची खात्री करण्यासाठी काही काळासाठी सतत बाईक चालवण्याचा सल्ला दिला. त्याने हा सल्ला ऐकला अन् बाईक सुरू ठेवून झोपला. त्यामुळे विषारी वायू तयार झाला अन् गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत्यूची नोंद करत चारही जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

त्या व्यक्तीनं बाईक सुरू करून घरातच पार्क केली. रात्रीची वेळ आणि थंडी असल्याने सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या. त्यामुळे हळूहळू बाईकच्या सायलेन्सरमधून निघणारा धूर घरात साठला आणि विषारी हवा तयार झाली. घर बंद होते आणि गॅस बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे झोपतच चौघांचा गुदमरून मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. बाईकमधून निघणारा धूर मृत्यूसाठी कारणीभूत ठरेल असे स्वप्नातही त्यांनी कधी विचार केला नसेल.

बाईकमधून निघणाऱ्या विषारी वायूने संपूर्ण घर भरले अन् ऑक्सिजन संपले. त्यामुळे काही वेळातच एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले जेवणानंतर झोपायला गेले होते, विषारी वायू तयार होताना त्यांना जाग आली नाही. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी बराच वेळ गेट उघडला नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दार ठोठावून बंद केलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी गेट तोडले आणि त्यांना चारही जण मृतावस्थेत आढळले. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT