Himachal Pradesh Saam Tv
देश विदेश

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. एका तरुणाचा कुरकुरे खाताना मृत्यू झाला. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तरुणाचा तडफडून मृत्यू झाला.

Priya More
  • कुरकुरे खाताना श्वसननलिकेत तुकडा अडकला

  • २८ वर्षीय तरुणाचा तडफडून मृत्यू

  • पीजीआय चंदीगडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

  • कुरकुरे खाताना काळजी घेण्याचे डॉक्टरांकडून आवाहन

हिमाचल प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरकुरे खाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खाताना कुरकुरेचा तुकडा तरुणाच्या श्वसननलिकेत अडकला. या घटनेत २८ वर्षीय तरुणाने तडफडून प्राण सोडले. आर्की उपविभागातील घनगुघाट ग्रामपंचायतीच्या ताल गावातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत शर्मा असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. हेमंत कसौली येथील एका खासगी हॉटेलमध्ये काम करत होता. घटनेच्या दिवशी तो घरी कुरकुरे खात बसला होता. त्यावेळी कुरकुरेचा तुकडा त्याच्या श्वसननलिकेत अडकला यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचार देऊन डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी पीजीआय चंदीगड येथे हलवण्यास सांगितले.

चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुणावर तातडीने उपचार सुरू केले. पण त्याची प्रकृती आणखी खालावत गेली. उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे तो राहत असलेल्या गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, हेमंत कुटुंबाचा आधारस्तंभ होता. तो घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता आणि कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडील रडून रडून बेहाल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT