Google
देश विदेश

Shocking : ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेला जिवंत जाळलं, अमेरिकेतील घटनेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

america Shocking news : ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेला जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अमेरिकेतील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर अमेरिकेतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेला जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकी आला आहे. या महिलेला जाळून हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आयलँड-स्टिलवेल एवेन्यू स्टेशनवर ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.

अमेरिकेमधील धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सकाळी साडे सात वाजण्याची ही घटना घजली आहे. ट्रेन स्टेशनवर उभी होती. त्यावेळी एक व्यक्ती पीडित महिलेजवळ आला. ट्रेनच्या डब्यात वातावरण शांत होतं. मात्र, अचानक हल्लेखोराने त्याच्याजवळील लायटर काढून महिलेच्या कपड्यांना आग लावली.

काही क्षणात महिला संपूर्णपणे होरपळली. हल्लेखोर तिला जळताना पाहत होता. त्यानंतर सुरक्षारक्षक धूर आणि आग पाहून घटनास्थळी उपस्थित झाले. त्यानंतर होरपळलेल्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेने जागीच प्राण सोडला. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेने लोकांमध्ये एकच दहशत पसरली.

या घटनेविषयी NYPD कमिश्नर जेसिका टीश यांनी सांगितलं की, 'या व्यक्तीने विकृत गुन्हा केला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये विचलित करणारी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बातमीसोबत देऊ शकत नाहीत. महिला जळताना पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढण्याच्या तयारी होता. परंतु पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. हल्लेखोर हा दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून पळण्याचा प्रयत्न करत होता. हल्लखोर ग्वाटेमालाचा प्रवासी आहे. हल्लेखोराने २०१८ साली एरिजोनामध्ये घुसखोरी केली होती.

हल्लेखोराने महिलेवर भीषण हल्ला का केला, याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर पीडित महिलेला ओळखत नव्हता. हल्लोखोराच्या विरोधात न्यूयॉर्क शहरात कोणताही गुन्हा नोंद नाही. तरीही या हल्लेखोराने महिलेची इतकी क्रूर हत्या का केली? हा सवाल कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT