Uttar Pradesh Mainpuri Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : शिक्षिकेच्या प्रेमात विद्यार्थी झाला वेडापिसा, प्रपोज केला पण नकार दिला, रागात तिच्या ओठांवरून चाकू फिरवला अन्...

Uttar Pradesh Mainpuri Crime News : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर भररस्त्यात बंदुकीचा धाक दाखवत अमानुष हल्ला केला. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

  • विद्यार्थ्याच्या एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला

  • भररस्त्यात बंदुकीचा धाक दाखवत अश्लील कृत्य

  • धारदार शस्त्राने शिक्षिकेचे ओठ कापले

  • CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

प्रेम आंधळं असतं! हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. या वाक्याची प्रचिती देखील तुम्हाला आली असेलच. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. एका नामांकित कॉलेजमधील विद्यार्थी त्याच्या शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम करत होता. या एकतर्फी प्रेमाचं प्रपोजल नाकारलं म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत भररस्त्यात भयंकर कृत्य केलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील कोतवाली परिसरात २० जानेवारी रोजी सदर घटना घडली आहे. आग्रा रोडवरील एका खासगी कॉलेजमध्ये पीडित शिक्षिका शिकवत होती. या कॉलेजमधील अखंड प्रताप नावाचा विद्यार्थी पीडितेवर एकतर्फी प्रेम करायचा. या एकतर्फी प्रेमातून तो दररोज संबंधित शिक्षिकेचा पाठलाग करायचा. तिची भर रस्त्यात छेड काढायचा. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रकाराबाबत शिक्षेकेने अखंड प्रतापच्या पालकांना तक्रार केली.

पालकांनी त्याला सक्त ताकीद दिली. मात्र याला न जुमानता विद्यार्थ्याचं गैरवर्तन सुरुचं राहिलं. २० जानेवारी रोजी पीडित शिक्षिका आग्रा रोडवरील खासगी शाळा सोडून मैनपुरी शहरातील ज्योती रोडवरील दुसऱ्या शाळेत शिकवण्यासाठी जात होती. यादरम्यान तिथे अखंड प्रताप पोचला. त्याने शिक्षिकेच्या खांद्यावर हात टाकला आणि अश्लील वर्तन केले. एवढ्यावरच न थांबता या विद्यार्थ्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. संतापलेल्या शिक्षिकेने त्याला विरोध केला.

या विरोधानंतर विद्यार्थी संतापला त्याने भररस्त्यात बंदुकीचा धाक दाखवत शिक्षिकेच्या ओठांना अश्लील स्पर्श केला आणि नंतर धारदार शस्त्राने शिक्षिकेचे ओठ कापले. या हल्ल्यात पीडित शिक्षिका गंभीर जखमी झाली. ही घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पीडितेला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयातून आग्रा येथील पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी विद्यार्थी अद्याप फरार असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापत

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाती निधनाला महिना पूर्ण; 30 दिवसात बदललं राज्याचं राजकारण

Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

Ajit Pawar Plane Crash: ट्रेनी विद्यार्थी चालवत होते 'एटीसी टॉवर'; अहवालातून बारामती विमानतळाबाबत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT