Delhi Car Theft News Saam Tv
देश विदेश

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Delhi News : दिल्लीमध्ये केवळ ६० सेकंदात महागडी गाडी चोरीला गेली. गाडीच्या मालकाने CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून गाडी सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

तुम्ही सुद्धा चारचाकी वाहन वापरात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गाडी चोरणाऱ्या चोरांने सहज गाडी चोरल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ स्वतः गाडीचे मालक ऋषभ चौहान यांनी केला असून फक्त ६० सेकंदापेक्षा कमी वेळात चोराने गाडीच्या सिस्टीममध्ये घुसून गाडी पळवल्याचे दिसून आले. पोलीस या चोराचा तपास करत आहेत.

दिल्लीमध्ये राहणाऱ्या ऋषभ चौहान यांनी महागडी गाडी त्यांच्या घराबाहेरील व्हरांड्यात लावली होती. रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका गाडीतून एक अज्ञात व्यक्ती उतरला. या व्यक्तीने ६० सेकंदापेक्षा कमी वेळेत गाडीतून खाली उतरून धारदार शस्त्राने वार करत त्याने गाडीची तोडफोड करत गाडीच्या सिस्टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीचा हा प्रयत्न सफल झाला आणि गाडी अनलॉक होऊन सुरु झाली. यानंतर या अज्ञात चोराने गाडी घेऊन पळ काढला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

या गाडीचे मालक ऋषभ चौहान यांनी ही घटना सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. शिवाय पोलीस तपास करून त्यांनी हुंडाई गाडी मालकांना थेट इशारा दिला आहे. ऋषभ चौहान यांनी त्यांच्या पोस्टवर म्हटले आहे की, "नमस्कार, माझी हुंडाई क्रेटा २१ जून २०२५ रोजी ६० सेकंदात चोरीला गेली. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, क्रेटा बाहेर पार्क केलेली असताना सुरक्षित नाही. सुरक्षा व्यवस्था हॅक किंवा लीक झालेली दिसते आणि एका मिनिटात ती बायपास करता येते." असे म्हणत त्यांनी हुंडाई इंडियाला टॅग केले आणि त्यांचे सुरक्षा सॉफ्टवेअर सुधारण्याचे आवाहन केले. पुढे चौहान म्हणाले "जर दिल्ली सुरक्षित नसेल, तर भारतातील इतर ठिकाणांच्या स्थितीची मला कल्पनाही करायची नाही."

याप्रकरणी पोलीस तपास करत असून पोलिसांनी वाहनधारकांना आपल्या वाहनांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ३० लाखांहून अधिक व्ह्युज आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT