child  saam tv
देश विदेश

धक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकल्याच्या घशामध्ये चिकटली टॉफी; श्वास थांबल्याने झाला मृत्यू

एका ४ वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्याला टॉफी चिकटल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कानपूरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ४ वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्याला टॉफी चिकटल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान या घटनेनंतर त्या मुलाच्या वडिलांनी टॉफी बनवणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार केली होती. मात्र संध्याकाळपर्यंत कुटुंबीयांनी तक्रार मागे घेतली. कुटुंबीयांनी पोलिसांना याप्रकरणी कोणतीही कारवाई नको असल्याचं लेखी कळवलंय.

ही संपूर्ण घटना कानपूरमधील बारा विभागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षांचा निरागस अन्वीत टॉफी खात होता, यावेळी अचानक टॉफी त्याच्या घशात अडकली. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र रूग्णालयात तासाभरानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं.

असं सांगण्यात येतंय की, ज्या कंपनीमुळे मुलाचा मृत्यू झाला ती टॉफी बनवणारी कंपनी इंदूर जिल्ह्यातील नोंदणीकृत आहे. ही कंपनी प्रसिद्ध ब्रँड किंडर जॉयच्या प्रती बनवते. अन्वितच्या कुटुंबीयांनी यापूर्वी टॉफी उत्पादक कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल करताना पोलिसांनी कारवाईचे आश्वासनही दिलं होतं. मात्र कुटुंबीयांनी ही तक्रार मागे घेतली.

दरम्यान पालकांनी देखील चिमुकल्या मुलांना काहीही खायला देताना काळजी घ्यावी. या घटनेमुळे आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये खासकरून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT