Shocking News Saam Tv
देश विदेश

Shocking: घरात पूजा ठेवली, पिरियड्स थांबवण्यासाठी गोळ्या खाल्ल्या, १८ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Periods Issue: घरामध्ये पूजा असल्यामुळे एका १८ वर्षांच्या मुलीने पिरिअड्स पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खाल्ल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर प्रचंड वेदना होऊन या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

घरामध्ये पूजा ठेवली असल्यामुळे पिरिअड्स पुढे ढकलण्यासाठी एका १८ वर्षांच्या तरुणीने गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. पिरिअड्स थांबवण्यासाठी तरुणीने हार्मोनल गोळ्या घेतल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर तिला प्रचंड वेदना व्हायला लागल्या. डॉक्टरांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. पण तिच्या वडिलांनी नकार दिला. यानंतर या तरुणीचा मृत्यू झाला.

व्हस्क्युलर सर्जन डॉ. विवेकानंद यांनी त्यांच्या रीबूटिंग द ब्रेन पॉडकास्टमध्ये या घटनेबद्दल सांगितले. ते म्हणाले की, एक १८ वर्षांची तरुणी तिच्या मैत्रिणींसह त्यांच्या क्लिनिकमध्ये आली होती. तिचे पाय आणि मांड्या दुखत होत्या आणि त्यांना सूज येत होती. तिला खूप अस्वस्थ वाटत होते. मी तिला हे कधीपासून सुरू झाले असे विचारले तेव्हा तिने सांगितले की घरी पूजा असल्याने पिरिअड्स थांबवण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेतल्या होत्या.

डॉ. विवेकानंद यांनी पुढे सांगितले की, 'जेव्हा आम्ही तिचा स्कॅन केला तेव्हा असे आढळून आले की तिला खोल वेदना थ्रोम्बोसिसचा त्रास होत होता आणि तिच्या नाभीजवळ गाठ आली होती. आम्ही तिच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. पण तिच्या वडिलांनी नकार दिला आणि सांगितले की तिची आई तिला उद्या घेऊन येईल.'

'त्यानंतर मध्यरात्री २ वाजता मला फोन आला की एका मुलीला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिला श्वास घेता येत नाही. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाला. डीप व्हेन थ्रोम्बोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे खोल शिरामध्ये सहसा पायांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते.', असे डॉ. विवेकानंद यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI New President: BCCI ला मिळाला नवा बॉस! 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली अध्यक्षपदाची धुरा

Crime News: झोपेत असताना चाकूने सपासप वार, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं; सांगली हादरले

Maharashtra Live News Update : साईबाबा संस्थानकडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी रूपयांची मदत जाहीर

Cholesterol Symptoms: त्वचेवर ही ५ लक्षणे दिसल्यास व्हा सावध! असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

Actress Son Death: धक्कादायक! अभिनेत्रीच्या मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्यू; मनोरंजनविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT