Shiv Sena case saam tv
देश विदेश

Shiv Sena Case live: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टातून महत्वाची अपडेट समोर; शिंदेंच्या वकिलांचा मोठा युक्तीवाद

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबत आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. आजच्या सुनावणीदरम्यान शिंदेंचे वकील नीरज कौल यांनी युक्तीवाद केला.

Priya More

शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंचे की उद्धव ठाकरे यांचे? याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल हे युक्तीवाद करत आहेत. निवडणूक आयोगाच्या निष्कर्षावर कौल सुप्रीम कोर्टासमोर युक्तीवाद करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ठाकरेंच्या पक्षात लोकशाही राहिली नव्हती. उद्धव ठाकरेंसोबत फक्त १५ आमदार होते', असा युक्तीवाद त्यांनी केला. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं? याचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत...

निवडणूक आयोगाच्या निष्कर्षावर कौल यांनी युक्तीवाद केला. त्यांनी कोर्टासमोर सांगितले की,'२०१८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद तयार करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हे पद स्वत:कडे ठेवले. या पदाकडे सर्व प्रकारचे अधिकार होते. त्यामुळे अधिकाराचे केंद्रीकरण झाले. उद्धव ठाकरेंच्या पक्षात लोकशाही राहिली नव्हती. ठाकरेंनी पक्षात लोकशाहीची मूल्य पाळली नाहीत.'

नीरज कौल यांनी कोर्टासमोर असाही युक्तीवाद केला की, 'ठाकरे-शिंदे यांच्यातील मतभेत राजकीय पक्षांपर्यंत आहेत. ठाकरेंच्या पक्षात पारदर्शकता नव्हती. शिंदेंसोबतच्या आमदारांना २०१९ मध्ये जास्त मतं मिळाली. एकनाथ शिंदेंच्या बाजूने बहुमत होतं. शिवसेना आमदार, खासदारांचा शिंदेंना बहुमताने पाठिंबा होता. उद्धव ठाकरेंसोबत फक्त १५ आमदार होते. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आली.'

'विधीमंडळ पक्षासह राजकीय पक्षात फूट पडली. मुख्य प्रतोदपदावर दोन्ही गटाकडून स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली. ९ सदस्यांची निवड कोणत्या आधारावर केली गेली? लाखो सदस्य असलेल्या कार्यकारणीत ९ सदस्य कसे?' असा सवाल कौल यांनी केला. तसंच,'या प्रकरणात फक्त बहुमत चाचणीचा पर्याय निवडणूक आयोगाकडे राहिला होता. पक्षाची संघटना, मोठ्या प्रमाणात पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते.', अशी माहिती नीरज कौल यांनी कोर्टाला दिली.

नीरज किशन कौल यांचा आजचा युक्तीवाद संपला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत. युक्तीवादासाठी २ सेशन हवे असल्याची विनंती कपील सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे. कायद्यातील मिथ दूर करण्यासाठी मला काही वेळ हवा आहे असे कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांनो, आजचे दर पाहाच! चांदी इतक्या हजाराने स्वस्त

Maharashtra News Live Update: राहुल-प्रियंका गांधी राजघाटावर पोहोचले

Toxic Wife Signs : तुमचीही पत्नी टॉक्सिक आहे का? ही आहेत लक्षणे

Nana Patekar Real Name: नाना पाटेकरांना 'नाना' का म्हणतात? त्यांचे खरे नाव काय?

fennel ajwain cumin water: सकाळीची सुरुवात करा बडीशेप-ओवा-जिरा पाण्याने; वजन कमी करणे ते डायबिटीजसाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT