Manipur Election Results 2022: शिवसेना- राष्ट्रवादीपेक्षा आठवलेंच लयभारी; रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी Saam Tv
देश विदेश

Manipur Election Results 2022: शिवसेना- राष्ट्रवादीपेक्षा आठवलेंच लयभारी; रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये खूप महत्व मिळत असताना दिसत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभा (maharashtra assembly) निवडणुकीमध्ये खूप महत्व मिळत असताना दिसत नाही. मात्र, मणिपूरमध्ये (manipur) रिपाइंचा १ उमेदवार आघाडीवर आहे. ही आघाडी कायम ठेवून रिपाइंच्या उमेदवाराने बाजी मारली आहे, तर रिपाइंचा ५ दशकानंतर महाराष्ट्राच्या (Maharashtra) बाहेरील राज्यात हा पहिलाच विजय असणार आहे.

हे देखील पहा-

या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उत्तर प्रदेशामध्ये (Uttar Pradesh) आणि पंजाबमध्ये आमदार होते. अगदी रिपब्लिकन पक्ष उदयाला आल्यानंतर देखील ही स्थिती होती. मात्र, रिपाइंच्या फाटाफुटीमुळे रिपाइंला महाराष्ट्राबाहेर कधीच यश मिळाले नव्हते. आता मणिपूरमध्ये उमेदवार जिंकल्यास रिपाइंचे हे महाराष्ट्राबाहेर असलेले पहिले यश असणार आहे. शिवाय रिपब्लिकन चळवळीमध्ये जिंकण्याची उभारी भरण्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असणार आहे.

किशमथोंग विधानसभा मतदारसंघामधून रिपाइंचे उमेदवार महेश्वर थौनॉजम निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदारसंघामध्ये ४०३ मतांनी आघाडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार सपम निशिकांत सिंग यांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे. यामुळे या मतदार संघात रिपाइंचे महेश्वर विजयी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ५ राज्यांपैकी काही राज्यामध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीने (NCP) देखील उमेदवार दिले होते. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय सोडा, साधी आघाडी देखील घेता आली नाही. याउलट या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे. तर, रिपाइंने मात्र मणिपूरमध्ये आघाडी घेऊन आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT