Uttarakhand Elections Results 2022: उत्तराखंडमध्ये नवा इतिहास रचला जाणार

आजच्या निकालानुसार भाजपच बाजी मारणार असल्याचं चित्र आहे.
Uttarakhand Elections Results
Uttarakhand Elections Results Saam Tv
Published On

Uttarakhand Assembly Election Results 2022: उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरुये. विधानसभेच्या 70 जागांसाठी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. आजच्या निकालानुसार भाजपच बाजी मारणार असल्याचं चित्र आहे. यासोबतच उत्तराखंड एक नवा इतिहास रचणार आहे (Uttarakhand Assembly Election Results 2022 BJP Will Make History).

Uttarakhand Elections Results
Goa Assembly Election Result: गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा 'नोटा'ला जास्त मतं

उत्तराखंडमध्ये भाजप इतिहास रचणार

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आजपर्यंत जे घडले नाही, ते यावेळी होताना दिसत आहे. इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष आपली सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीनंतरच्या (Uttarakhand Assembly Election) मतमोजणीतून समोर आलेला कल पाहाता भाजपला (BJP) बहुमत मिळाले आहे.

उत्तराखंड राज्यातील 70 जागांपैकी भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) सध्या केवळ 22 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 4 जागांवर पुढे आहेत. पंजाबमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाने (AAP) येथे खातेही उघडलेले नाही.

उत्तराखंडमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपने प्रथम त्रिवेंद्रसिंग रावत आणि नंतर तीरथसिंग रावत आणि नंतर पुष्कर सिंह धामी यांना तरुण मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवले. त्यानंतर भाजपला विरोधकांकडूनच नाही तर स्वत:च्या पक्षातील लोकांचीही नाराजी सहन करावी लागली होती. तीन वेळा मुख्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेसकडून भाजपच्या कमकुवत नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, यासर्वांनंतर आलेला हा निर्णय अत्यंत आश्‍चर्यकारक आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्री बदलल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

मात्र, निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी दावा केला होता की मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलल्याने निवडणुकीत काहीही फरक पडणार नाही. कारण त्यांच्या कामावर सर्वसामान्य जनता त्यांना मत देईल. आता तेच खरं ठरताना दिसत आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com