Share Market News Updates, Sensex Updates, Nifty Today, Sensex Today, share market news today  Saam Tv
देश विदेश

शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्समध्ये 1100 अंकानी कोसळला

जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर (Share Market) दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्यपूर्ण घसरण होत असताना सोमवार आणि मंगळवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला होता. मात्र, पुन्हा रक्दा काल शेअर बाजारात घसरण झाली होती. आज घसरणीचे हेच सत्र पुन्हा कायम राहिले आहे. (Share market news today)

हे देखील पाहा-

आज शेअर बाजार (Share Market) सुरु होतानाच मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाल्याचे बघायला मिळाले आहे. सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरून ५३०७०.३० वर सुरु झाला आहे, तर निफ्टी ३२२.९ अंकांनी घसरून १५९१७.४० वर सुरु झाला आहे. २ दिवसांच्या वाढीवर, बुधवारी बाजार हलक्या लाल चिन्हात बंद झाला आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १०९.९४ अंकांनी म्हणजे ०.२० टक्क्यांनी घसरून ५४,२०८.५३ वर बंद झाला होता.

दुसरीकडे, निफ्टी १९.०० अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी घसरून १६,२४०.३० वर बंद झाला. फार्मा आणि एफएमसीजी शेअर्सने दुपारपर्यंत देशांतर्गत बाजारात चांगली मजबूती होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी म्हणाले आहेत. इंग्लंडमध्ये किरकोळ महागाईची वाढती आकडेवारी आणि फेडच्या अध्यक्षांकडून महागाई कमी करण्याचे आश्वासन यामुळे मार्केटमधील भावना खराब झाली आहे. पुढे जाऊन जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात झालेली वाढ बघायला मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT