NCP MP Disqualification Saam Tv
देश विदेश

NCP MP Disqualification: शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या खासदाराचं लोकसभेतून निलंबन

NCP MP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाला एकामागून एक मोठे धक्के मिळत आहेत.

Bharat Jadhav

NCP Lakshadweep MP Mohammed Faizal :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाला एकामागून एक मोठे धक्के मिळत आहेत. महाराष्ट्रातील पक्षात फूट पडल्याचा धक्का मिळाल्यानंतर शरद पवार यांची इतर राज्यातील पावर कमी होताना दिसत आहे. लक्ष्यदीपचे राष्ट्रवादी काँग्रेस खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेत अपात्र ठरवण्यात आलंय. केरळ उच्च न्यायालयानं हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर फैजल यांचे लोकसभेत अपात्र करण्यात आलं. खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. (Latest News)

केरळच्या उच्च न्यायालयाच्या दिनांक 0३.१० २०२३ च्या आदेशानुसार, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या लक्षद्वीप संसदीय मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा सदस्य श्री मोहम्मद फैजल पी.पी. यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्याच्या दोषी ठरविण्याची तारीख, म्हणजे ११ जानेवारी, २०२३ ,असं लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिनमध्ये म्हटलंय.

LiveLaw नुसार, न्यायमूर्ती एन. नागरेश म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी गंभीर चिंताजनक आहे. गुन्हेगारी पूर्ववृत्त असलेल्या व्यक्तींना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतरही निवडून आल्यानंतर प्रतिनिधी त्यांना कायम ठेवल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल.न्यायाधीश म्हणाले की काही प्रकरणांमध्ये न्यायालयाला जर हा खटला निरर्थक असल्याचे वाटलं, तरच फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ३८९ अंतर्गत दोषसिद्धीला स्थगिती दिली जाऊ शकते.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार फैजल आणि इतर तिघांच्या शिक्षेवर स्थगिती असणार आहे. ही स्थगिती अंतिम निकाल लागेपर्यंत कायम राहील. ११ जानेवारी २०२३ रोजी कावरत्ती सत्र न्यायालयानं फैजल आणि इतर तिघांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

Crime: परदेशातून यायचा, 10 वर्षाच्या बालिकेला दारू पाजून अत्याचार करायचा, आईच मुलीला नराधम म्हाताऱ्याकडे सोडायची

Maharashtra Live News Update: कोंढवा गोळीबार प्रकरण; पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली

SCROLL FOR NEXT