Shah Jahan Sheikh  Saam Digital
देश विदेश

Shah Jahan Sheikh : ईडीच्या पथकावर हल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक; १० दिवसांची पोलीस कोठडी

Sandeep Gawade

ED Arrest TMC Leader

काही दिवसांपूर्वी प. बंगालच्या संदेशखळी भागात धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर शहाजहान शेख ५५ दिवस गायब होते. दरम्यान प. बंगाला पोलिसांनी आज पहाटे त्यांना अटक केली आहे. त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी बेटावर घडलेल्या या हिंसक घटना घडली होती. त्यानंतर उघड झालेल्या जमीन हडप आणि लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये शहाजहान शेख आणि त्याचे साथीदार प्रमुख आरोपी असल्याचं आढळलं होतं. दरम्यान पोलिसांनी पूर्ण मुदत मागितली असली तरी न्यायालयाने केवळ 10 दिवसांची मुदत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर छापेमारी सुरू असताना पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर 'भाई' नावाने प्रसिद्ध असलेले टीएमसीचे स्थानिक नेते सहजाहान शेख चर्चेत असून ईडीवर झालेल्या हल्ल्यामागे त्यांचा हात असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून प. बंगाल मधील राजकीय वातावरण तापलं होतं. तसंचं विरोधी पक्षांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जवळपास ८०० ते १००० जणांच्या जमावाने ईडीवर हल्ला केला असून अधिकाऱ्यांसह वाहनांना लक्ष करण्यात आलं होतं. या हल्ल्यात तीन अधिकारी जखमी झाले आहेत. यावेळी सीआरपीएफचे २७ जवान उपस्थित होते. संतप्त जमावाने अधिकाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीटंही हिसकावण्यात आली. दरम्यान या हल्ल्याला तृणमूल कॉंग्रेसचे स्थानिक नेते शाहजहान शेख यांना भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी जबाबदार धरलं होतं.

कोण आहेत शाहजहान शेख

बांगलादेशच्या सीमेनजीक असलेल्या २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी ब्लॉकमध्ये शाहजहान शेख मासळी व्यवसायाशी संबंधीत होते. चार भावंडांमध्ये सर्वात मोठे असलेल्या शाहजहान यांनी मत्स्यशेती आणि वीटभट्यांमध्ये कामगार म्हणून देखील काम केलं आहे आणि याच व्यवसायाने त्यांना राजकारणात आणलं. २००४ मध्ये त्यांनी वीटभट्टी कामगारांचे नेते म्हणून राजकारणात प्रवेश केला. आता प. बंगालमधील मत्स्यव्यवसायातील शाहजहान एक मोठं नाव आहे. पं. बंगालमधील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. त्याला न जुमानता त्यांनी आपलं अस्तित्व कायम राखलं आणि २०१२ मध्ये तृणमूलच्या प्रमुख नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT