Student Died  Sakal
देश विदेश

Girl dies of heart attack: धक्कादायक! पहिलीत शिकणाऱ्या मुलीला शाळेत खेळत असताना आला ह्रदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

Seven year old child suffers fatal heart attack while playing: उत्तरप्रदेश जिल्ह्यातील बापगत सरूरपूर गावात, एका पोलीस हवालदाराच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. मात्र, डॉक्टारांनी तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती दिलीय.

Bhagyashree Kamble

उत्तराखंड जिल्ह्यातील बापगत सरूरपूर गावात, एका पोलीस हवालदाराच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, डॉक्टारांनी तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती दिली आहे. ७ वर्षीय मुलीचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाल्यानं उत्तरप्रदेशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बागपत जिल्ह्यातील सरूरपूर गावात यूपी पोलिस कॉन्सटेबलच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. चिमुकलीचं नाव अपेक्षा असून, तिचं वय अवघं ७ वर्ष आहे. इयत्ता पहिलीत शिकत असलेली अपेक्षा ही दुपारी जेवणाच्या वेळी शाळेच्या मैदानात खेळत होती. मात्र, खेळत असतानाच ती चक्कर येऊन खाली पडली. तिला तातडीने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अचानक मृत्यूचे कारण काय?

प्राथमिक तपासात खासगी डॉक्टरांनी मृ्त्यूचे कारण ह्रदयविकाराचा झटका असल्याचे सांगितलं. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कुटुंबियांनीही मुलीचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झालं असल्याचं म्हटलं आहे.

अपेक्षा इयत्ता पहिलीत शिकत होती. तिचे वडील बिजनौरमध्ये यूपी पोलिसात हवालदार आहेत. कौटुंबिक मतभेदांमुळे ती आपल्या आजोळात राहत होती. तसेच शिकण्यासाठी ती गावातील योगीनाथ पीठ पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती. या घटनेनंतर, कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली असून, दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभिऱ्यांने घेत तपास करत आहेत. सध्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मुलीच्या मृत्यूचे खरं कारण समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT