IAF google
देश विदेश

IAF woman officer News : विंग कमांडरने रात्री रुमवर बोलावलं अन्...; एअरफोर्स महिला अधिकाऱ्याचा गंभीर आरोप, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

IAF woman officer news update : एअरफोर्स महिला अधिकाऱ्याने विंग कमांडरवर गंभीर आरोप केला आहे. महिला अधिकाऱ्याच्या आरोपानंतर हवाई दलात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

श्रीनगर : हवाई दलाच्या श्रीनगरमध्ये तैनात असलेल्या एअरफोर्स महिला अधिकाऱ्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला अधिकाऱ्याच्या आरोपानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी विंग कमांडरविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील बडगाम पोलीस स्टेशनमध्ये रविवारी आरोपी विंग कमांडरच्या विरोधात एफआयर नोंदवण्यात आला आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी रात्री नव्या वर्षाच्या पार्टीदरम्यान अत्याचार केल्याचा महिला अधिकाऱ्याचा आरोप आहे.

महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटलं की, 'पार्टीनंतर विंग कमांडरने म्हटलं की, तुम्हाला गिफ्ट मिळालं का? मी म्हटलं की, मला काहीच मिळालं नाही. त्यानंतर त्याने रुममध्ये बोलावलं. रुममध्ये जाताच त्याने माझ्यासोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्याला विरोध केला. मात्र, त्याने अत्याचार सुरुच ठेवला'.

एअरफोर्स महिला अधिकाऱ्याने पुढे म्हटलं की, 'अखेर मी त्याला धक्का देऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्याने म्हटलं की, शुक्रवारी पुन्हा भेटुयात. विंग कमांडरने केलेल्या कृत्याच्या विरोधात आवाज उचलण्यास खूप वेळ गेला. मी घाबरली होती. मला समजत नव्हते की, मी काय करू? या घटनेनंतर तो काही झालंच नसल्याचं भासवायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर घृणास्पद कृत्य केल्याचा कोणताच भाव नव्हता'.

महिलेचा 5 इतर अधिकऱ्यांवर गंभीर आरोप

महिला अधिकाऱ्याने तक्रारीत ५ इतर अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. महिला अधिकाऱ्याने ५ जणांवर पाठलाग करणे, छळ करणे आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

हवाई दलाचं म्हणणं काय?

हवाई दलाने या प्रकरणावर अधिकृत भाष्य केलं. हवाई दलाचं म्हणणं आहे की, 'आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. बगडाम पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी हवाई दलाशी संपर्क साधलाय. आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT