Ghulam Nabi Azad resigned SAAM TV
देश विदेश

Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, सोनिया गांधींना लिहिलं ५ पानी पत्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Nandkumar Joshi

Ghulam Nabi Azad Latest News | नवी दिल्ली: देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणता येईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या (Congress) प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना त्यांनी पाच पानी पत्र लिहिलं आहे.

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसवर नाराज होते. बऱ्याच काळापासून त्यांची ही नाराजी होती. जी-२३ गट हा काँग्रेसमध्ये बदल करण्याची मागणी सातत्यानं करत होता. या गटात आझाद देखील होते. यापूर्वी काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांना समाजवादी पक्षाने राज्यसभेवर देखील पाठवले आहे.

काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये आझाद यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना निवडणूक अभियान समितीचे अध्यक्ष केले होते. मात्र, काही तासांतच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांची नाराजी उघड झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते.

गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याचे स्पष्ट झाले होते. पक्षाची भूमिका आणि अध्यक्षपद निवडणूक आदींसह इतर मुद्द्यांवरही त्यांच्यात मतभेद होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT