बिहारमधील मुझ्झफरनगर येथील महेशपूर गावचे रहिवासी आणि भाजप पूर्वी मंडळाच्या मत्स्यजीवी मंचाचे संयोजक विशेश्वर सहनी यांचे सोमवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते आणि काही मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. पटना येथील आयजीएमएस रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेश्वर सहनी हे तेपरी पंचायत अंतर्गत महेशपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात तसेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन पुत्रांसह मोठा परिवार आहे.
मंगळवारी त्यांच्या मूळ गावी असलेल्या मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पुत्र अनिल कुमार यांनी मुखाग्नि दिली. त्यांच्या निधनावर भाजप मंडळ अध्यक्ष अशोक सिंह, महामंत्री श्याम किशोर, राजद प्रखंड अध्यक्ष रविंद्र सहनी, शिक्षक ललन प्रसाद सिंह, संजय कुमार ठाकूर, अभिषेक कुमार आणि विक्रम कुमार यांच्यासह शेकडो नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती गाढ संवेदना व्यक्त केल्या. नेते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या निधनाला समाजासाठी अपूरणीय हानी असल्याचे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वीच राजस्थानमधील जयपूरचे भाजप नेते रामवतार असवाल उर्फ पप्पू यांची अतिशय क्रूर हत्या करून त्यांचा मृतदेह एका भंगारच्या गोदामात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला होता. आस्वाल हे भाजप मोर्चाचे एससी मंडळाचे अध्यक्ष होते. या हत्येच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती आणि राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रमक होत धरणे आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या सोमवारी रात्री उशिरा मनोहरपरमध्ये झाली. मनोहरपुरमधील बसस्थानकाजवळील एक भंगार गोदामात रामावतार यांचा मृतदेह आढळला. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटणातस्थळी दाखल झाले आणि रामवतार यांना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.