ganga river self purification Saam tv
देश विदेश

Ganga River Water: गंगा नदीच्या पाण्यात शुद्ध होण्याची क्षमता, 12वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणातून झाले सिद्ध

Ganga River Water Self Purification Capacity: गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेवरुन आज पर्यंत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होते. नुकत्याच केलेल्या संशोधनातून गंगेचे पाणी स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता ठेवते हे सिद्ध झाले आहे.

Saam Tv

दर बारा वर्षाने कुंभमेळा हा आपल्या देशात होत असतो. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मोठ्या उत्साहात सुरू असून, या कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येत आहे आणि स्नान करत आहे. 14 जानेवारी पासून सुरू झालेला हा कुंभमेळा 26 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. शाहीस्नानाच्या दरम्यान कोट्यवधी लोक या तिथीचा लाभ घेण्यासाठी गंगेत डुबकी मारतात. यामुळे गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रदूषणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. पण गंगा नदीच्या पाण्यात काही असे गुण आढळले आहे जे पाणी स्वतःच स्वतःला शुद्ध करते, आणि हे कोणत्या साधू, महंताचे मत नसून तर हे पर्यावरण क्षेत्रात देशात अव्वल स्थानी असलेल्या 'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था'यांनी केलेल्या 12 वर्षाच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

तब्बल बारा वर्ष निरीने गोमुख ते गंगासागर दरम्यान गंगेच्या पाण्याचा सखोल अभ्यास केला, आणि त्यामध्ये गंगेच पाणी काही खास गुणांमुळे स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता ठेवते, जर गंगेच्या पाण्याला निरंतर वाहू देण्यात आले, तर गंगेच्या पाण्यातील ऑक्सिजनचे उच्च प्रमाण, काठावरील वनस्पतीमुळे पाण्यात विरघळणारे टरपीन्स खास बैक्टेरियोफाज आणि गंगेच्या तळाशी असलेले सेडीमेंट्स गंगेच्या पाण्याला थोड्या काही किलोमीटरच्या प्रवाहात पुन्हा शुद्द करते. असे निरीच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. निरीने डिसेंबर 2024 मध्ये हे अहवाल केंद्र सरकारला सादर केल्याची माहिती आहे.

गंगेच्या पाण्यातील स्वशुद्धीकरणाचे घटक

NEERI च्या संशोधनानुसार, गंगेच्या पाण्यात चार महत्त्वाचे घटक आढळून आले आहेत, जे गंगेला शुद्ध करतात.

- बॅक्टीरिओफाज हे सूक्ष्मजीव पाण्यातील हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करतात.

- टरपिन संयुगे – नैसर्गिकरित्या पाण्यात असलेली ही संयुगे जंतुनाशक म्हणून कार्य करतात तसेच गंगेच्या किनाऱ्यावर अनेक झाडे झुडपे आणि नैसर्गिक वनस्पती आढळतात ते मोठ्या प्रमाणात "टरपीन्स" तयार करतात आणि तेच टरपीन्स गंगेच्या पाण्याला शुद्ध करतात.

- डिझॉल्व्हड ऑक्सिजन – पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने जलजीवन सुदृढ राहते.

- ट्रेस मेटल्स – गंगेच्या तळाशी असलेले सूक्ष्म खनिज घटक पाण्याच्या गाळण्याच्या प्रक्रियेस मदत करतात.

नीरीने हे अभ्यास कसे केले?

गंगा नदीचा गोमुख ते गंगासागर हा 2500 किमी लांबीचा प्रवाह संशोधनासाठी तीन भागांमध्ये विभागण्यात आला होता.

पहिला भाग गोमुख ते हरिद्वार, दुसरा भाग हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा भाग म्हणजे पाटणा ते गंगा सागर असा होता.

एकूण १५५ जागांवर हजारो सॅम्पल्स घेण्यात आले.

या अभ्यासात नीरीसह विविध आयआयटी, बनारस हिंदू विद्यापीठ सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी सुद्धा सहकार्य केले आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये नीरीने गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचा निष्कर्ष केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

दरम्यान गंगेची ही वैशिष्ट्य ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात असे प्रश्न ही पडू शकतात की बाकीच्या नद्यांत हे गुण नाहीत का. तर नीरीने त्याचा ही सखोल अभ्यास केला असून नीरीने गंगे सह तुलनेसाठी यमुना आणि नर्मदेच्या पाण्याचा ही सारखाच अभ्यास केला असून त्यात पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, पाण्यात विरघळणारे टरपीन्स, बैक्टेरियोफाज आणि सेडिमेंट या चारही गुणांच्या बाबतीत यमुना आणि नर्मदा गंगेच्या बऱ्याच मागे आहेत असे निरीला आढळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT