Uttar Pradesh News : भारतीय व्यक्तीच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून चार मुलांसह भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने ताब्यात घातले आहे. ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथून एटीएसने सचिन, सचिनचे वडील आणि सीमाला ताब्यात घेतलं आहे. सोमवारी यूपी पोलिसांचे पथक साध्या गणवेशात सचिनच्या घरी पोहोचले आणि तिथून तिघांना सोबत घेऊन गेले.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या सीमा हैदरबाबत गुप्तचर यंत्रणा अत्यंत सावध झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरच्या पाकिस्तान ते नोएडापर्यंतच्या प्रवासाबाबत गुप्तचर विभाग चौकशी करणार आहे. सीमाच्या संपूर्ण हालचालींवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच सीमाला पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. (Uttar Pradesh News)
ऑनलाइन गेम PUBG खेळता खेळता दोघे प्रेमात पडल्याचे सांगितले जात आहे. या गेमिंग अॅपवर दोघांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली. यानंतर पाकिस्तानमधील सीमा ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या सचिनच्या प्रेमात चार मुलांसह तीन देशांची सीमा ओलांडून भारतात आली. सीमाने सचिनसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नही केले. (Latest Marathi News)
सीमा आणि सचिनची भेट २०१९ मध्ये कोरोनाच्या काळात झाली होती. जानेवारी 2021 मध्ये दोघांनी आपले प्रेम व्यक्त केले. विशेष म्हणजे 4 जुलै रोजी सीमाला तिच्या 4 मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
त्याचवेळी सचिन आणि त्याच्या वडिलांना अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावर्षी मार्चमध्ये दोघांनी काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात लग्न केल्याची माहिती सीमाने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.