Encounter in Kulgam  Saam Tv
देश विदेश

जम्मू-काश्मीरच्या देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorists) मोठी चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली

साम टीव्ही ब्युरो

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorists) मोठी चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कुलगामच्या (Kulgam) देवसर परिसरात पोलीस (Police) आणि लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. मिळालेल्या, सुरक्षा दलाच्या घेराबंदीत जैश- ए- मोहम्मदचे २ ते ३ दहशतवादी अडकले होते. सध्या या चकमकीविषयी लष्कराकडून फारशी माहिती देण्यात आली नाही. मात्र, रात्री उशिरापासून गोळीबार (Firing) सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पाहा-

जम्मू-काश्मीरच्या (​​Jammu and Kashmir) श्रीनगरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शहरामधील सफाकदल भागातील आयवा पुलाजवळ ही धक्कादायक घटना घडली. सकाळी ८.४० च्या सुमारास जम्मू- काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल गुलाम हसन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधामध्ये सुरक्षा जवानांची कारवाई सुरू आहे, जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे ३ दहशतवादी मारले गेले आहेत. जिल्ह्यातील पहलगाम भागात श्रीचंद वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती देण्यात आली होती. यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, सुरक्षा दलांनी त्याला प्रत्युत्तर देत ३ खात्मा करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

Maharashtra Live News Update : पुणे महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

SCROLL FOR NEXT