उत्तराखंड: बद्रीनाथ धामचे दरवाजे आज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर ६.१५ वाजता उघडण्यात आले आहेत. पुढील ६ महिने भाविकांना मंदिरात भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेता येणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक बद्रीनाथला पोहोचले आहेत. दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी, भगवान बद्री विशाल यांना नैवेद्य दाखवण्यात आला आहे. यावेळी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बद्रीनाथ धामाबरोबरच (Badrinath Dham) आज सकाळी ६.१५ वाजता सुभाई गावात (village) असलेल्या भविष्य बद्री धामचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहे.
हे देखील पाहा-
दुसरीकडे, केदारपुरीचे (Kedarpuri) रक्षक बाबा भुकुंत भैरव मंदिराचे (temple) देखील दरवाजे उघडल्याने शनिवारपासून केदारनाथ धाममध्ये रोज पूजा आणि संध्याकाळची आरती सुरू करण्यात आली आहे. शनिवारी पांडुकेश्वरच्या योग ध्यान बद्री मंदिरात बद्रीनाथचे रावल (मुख्य पुजारी) ईश्वर प्रसाद नंबूदिरी, नायब रावल शंकरन नंबूदिरी, धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल आणि बद्रीनाथचे वेदपाठी आचार्य यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणांच्या डोलीवर उभ्या असलेल्या देवाची पूजा करण्यात आली आहे.
गुरू शंकराचार्य द गद्दी आणि तेल कलश यात्रा दुपारी बद्रीनाथ धाम येथे पोहोचली होती. कुबेरजींची डोली रात्रीच्या मुक्कामाकरिता बामणी गावात पोहोचली होती. कुबेरजींची डोली रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास बद्रीनाथ मंदिराच्या गर्भगृहात दाखल झाली आहे. बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, उपाध्यक्ष किशोर पनवार, माजी आमदार महेंद्र भट्ट, बद्रीनाथचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीडी सिंह तसेच बीकेटीसीचे इतर कर्मचारी आणि यात्रेकरूंनी रावल, शंकराचार्य गड्डीस्थल आणि गडू पिचर यांना पुष्पहार घालून बद्री विशाल यांचा जयघोष करण्यात आला आहे.
दरावाजे असे उघडले
पहाटे - ५ - वाजता भगवान कुबेरजींची डोली बद्रीनाथच्या दक्षिण दरवाजातून आत आली.
५:१५ - वाजता गेट क्रमांक तीनमधून मंदिरात प्रतिष्ठित व्यक्तींचा प्रवेश.
५:३० - वाजता रावल, धर्माधिकारी आणि वेदपाठींनी उद्धवजींसोबत मंदिरात प्रवेश केला. ५ रावल व धर्माधिकारी यांच्या हस्ते द्वारपूजन.
६:१५ - वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले.
९:३० - वाजता गर्भगृहात भगवान बद्रीनाथाची पूजा सुरू होईल.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.