प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत चौथा दहशतवादी हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मागील तीन हल्ल्यांमध्ये एका जवानासह १० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मागच्या तीन दिवसात दहशतवाद्यांकडून चौथा हल्ला करण्यात आला आहे. परंतु यावेळी सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांचा हल्ला हाणून पाडला आहे.
काल रात्री उशिरा डोडामधील गंडोह येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एक जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांचा रात्रभर शोध सुरू सुरू होता. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) वातावरण काहीसं तापलेलं आहे. जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जम्मू-काश्मीरमधील रियासी आणि कठुआनंतर आता डोडामध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. तीन दिवसांतील हा चौथा हल्ला (Jammu Kashmir Terrorists Attack) आहे. यावेळी दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या कार्यरत तळावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर डोडा येथील छत्रकला येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात लष्कराचे पाच जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये एका विशेष पोलीस अधिकाऱ्याचा (एसपीओ)ही समावेश (Terrorists Attack) आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काश्मीर टायगर नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे ९ जून रोजी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला. ९ जून रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा हल्ला झाला होचा. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला (Killed Terrorists) होता, त्यानंतर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल खड्ड्यात कोसळली होती. बसवर हल्ला करणारे दहशतवादी डोंगराळ भागात लपून बसले होते. तर या घटनेत १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.