PM Narendra Modi in SCO Summit  SAAM TV
देश विदेश

PM Modi In SCO Summit : शी जिनपिंग, शरीफ समोर ऐकत होते; PM मोदींनी सर्वांसमोर पाकिस्तान, चीनला झोडपून काढले

PM Narendra Modi in SCO Summit : नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीनला खडेबोल सुनावले.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi On Terrorism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO Meet) बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीन या शेजारी देशांना खडेबोल सुनावले. सर्व देशांनी अन्य देशांच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचा सन्मान करायला हवा, असं मोदी म्हणाले. विशेष म्हणजे दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी हे कानपिचक्या देत असताना, या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगही सहभागी झाले होते. (National News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यात ते म्हणाले की, 'मागील दोन दशकांमध्ये एससीओ (SCO) आशियाई प्रदेशाच्या समृद्धी, शांतता आणि विकासाकरिता प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.' यावेळी मोदींनी पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. सर्व देशांनी अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करायला हवा, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली शांघाय सहकार्य संघटनेची ही बैठक झाली. या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे देखील सहभागी झाले होते. एससीओकडे एक कुटुंब म्हणून बघतो, असं यावेळी मोदींनी सांगितले.

पाकिस्तानचे कान पिळले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी धोकादायक आहे. आपल्या सर्वांनी मिळून त्याचा सामना करायला हवा. काही देश सीमेपलीकडील दहशतवादाचा वापर आपल्या धोरणांचा भाग म्हणून करतात. असे देश दहशतवाद्यांना आसरा देतात. एससीओ देशांनी दहशतवादाचा निषेध नोंदवायला हवा. दुटप्पी भूमिका नको, अशा शब्दांत मोदींनी थेट नाव न घेता पाकिस्तानला सुनावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT