Delhi Air Pollution: राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाने आता धोक्याची पातळी गाठली आहे. हवा अत्यंत विषारी झाली आहे. रविवारी दिल्लीचा AQI 450 पार पोहचला होता. आप सरकारने दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP-4 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. आजपासून दिल्लीतील शाळा फिजिकली बंद करण्याची घोषणा कऱण्यात आली आहे. दहावी आणि बारावी वगळता सर्व शाळा ऑनलाइन सुरु राहती, असे जाहीर करण्यात आलेय. त्याशिवाय शहरामध्ये मोठ्या ट्रक आणि वाहना येण्यास मनाई करण्यात आली आहे. शक्य तितके वर्क फ्रॉम होम करण्यात यावे, असा सल्लाही कंपन्यांना देण्यात आलाय. (delhi these restrictions come into effect from today entry of trucks banned schools up to 9th closed)
राजधानी दिल्लीमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी CAQM ने आजपासून GRAP-IV चे नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली. दिल्ली आणि एनसीआरमध्ये GRAP-4 निर्बंधांमुळे, शाळा ऑनलाइन मोडवर गेल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या शाळा फक्त सुरु राहतील, इतर शाळा ऑनलाइन सुरु असतील. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, सोमवारपासून शहरात GRAP-4 लागू करण्यात येईल. त्यायामुळे 10वी आणि 12वी वगळता सर्व विद्यार्थ्यांसाठी शारीरिक वर्ग बंद केले जातील. पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरु राहतील.
आप सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय आज दुपारी 1 वाजता दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते GRAP-4 आणि दिल्लीतील प्रदूषणाच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद घेण्याआधी ते सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत.
हवा गुणवत्ता पॅनेलने ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) च्या फेज-4 अंतर्गत दिल्ली-एनसीआरसाठी अनेक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी 8 पासून हे लागू करण्यात येणार आहेत. ट्रकच्या शहरातील प्रवेशावर बंदी आणि सार्वजनिक प्रकल्पांच्या बांधकामांना तात्पुरती स्थगितीचा समावेश असेल.
अत्यावश्यक सेवा वगळता, BS-IV किंवा जुन्या डिझेल मध्यम आणि अवजड वस्तूंच्या वाहनांना दिल्लीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, पॉवर लाईन, पाइपलाइन आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांसह सर्व बांधकाम उपक्रमांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली. सहावी, नववी आणि अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सरकारी कार्यलय फक्त ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवावे, असा सल्लाही देण्यात आलाय. जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात यावे, असेही सांगण्यात आलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.