School van driver physical assault 4-year-old girl Saam Tv News
देश विदेश

स्कूल व्हॅन चालकाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; प्रायव्हेट पार्टला इजा अन् मारहाण, परिसरात खळबळ

School van driver physical assault 4-year-old girl: एका स्कूल व्हॅन चालकानं चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून उघडकीस आली आहे.

Bhagyashree Kamble

महिलांनंतर आता लहान मुलीही असुरक्षित असल्याचं चित्र आहे. एका स्कूल व्हॅन चालकानं चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मुलीनं सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली. तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. संतप्त महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या इंदिरानगर येथील एका नामांकित शाळेच्या व्हॅन चालकानं ४ वर्षीय चिमुकलीवर दुष्कृत्य केलं आहे. शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनमध्ये नराधमानं तिच्यावर बलात्कार केला. घरी गेल्यानंतर चिमुकलीनं तिच्या आईला घटनेची माहिती दिली. मुलीनं आपबिती सांगितल्यानंतर त्यांच्या पायाची वाळू सरकली.

महिलेनं थेट शाळा गाठली. आरोपीनं पीडितेच्या आईला धमकी दिली. शाळा व्यवस्थापनानेही या प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. यानंतर त्या महिलेनं इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. तसेच व्हॅन चालक मोहम्मद आरिफ आणि व्यवस्थापक संदीप कुमार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक मोहम्मद आरिफला अटक केली आहे.

पीडितेच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी चिमुकली व्हॅनमध्ये एकटीच होती. त्यानं तिच्यावर दुष्कृत्य केलं. मुलीनं सगळी माहिती दिली. त्यानंतर तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिच्या जखमांबाबत माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बलात्कारादरम्यान, मुलीनं विरोध केला होता. तेव्हा आरोपीनं चिमुकलीला मारहाण केली. तसेच धमकावले. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Aarkshan : बीड जिल्हा बंदची हाक; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक, सरकारच्या निषेधार्थ उद्या बंद

Manoj jarange patil protest live updates: आम्हाला तुमच्याविरुद्धही आदेश द्यावे लागतील, उच्च न्यायालय पोलिसांवर संतापले

Hiccups : मला लागली कुणाची उचकी..., करा 'हे' उपाय, २ मिनिटांत उचकी गायब

Daily Steps: वयाप्रमाणे रोज किती पावले चालणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Maratha Protester: सीएसएमटीवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त; RAF-SRPF फोर्स दाखल, आंदोलनस्थळी परिस्थिति काय ? VIDEO

SCROLL FOR NEXT