Saurabh Kirpal
Saurabh Kirpal  Twitter
देश विदेश

Supreme Court Collegium : समलैंगिक सौरभ कृपाल होणार दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश? सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडून पुन्हा शिफारस

Shivaji Kale

SC Collegium News : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम ने सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती करावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या अगोदर देखील अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, केंद्र सरकारने समलैंगिक अधिकारांबाबत त्यांचा असणारा आग्रह पाहता त्यांच्या पुर्वग्रह संभावनांना नकार देऊ शकत नाही. म्हणून तो परत पाठवला होता. (Latest Marathi News)

कॉलेजियमने सरकारचा हा प्रस्ताव नाकारत पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवला आहे. संवैधानिक अधिकारांचा विचार करता ते योग्य होणार नाही, असं कॉलेजिअमने म्हटलं आहे. गेल्या ५ वर्षापासून या संदर्भात केंद्र सरकारकडे (Central Government) प्रस्ताव प्रलंबित आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. कृपाल हे एलजीबीटी (LGBT) समुदायातून येतात. सौरभ कृपाल हे सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश यांचा सुपुत्र आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमचं म्हणणं आहे की, २०१७ साली दिल्ली हायकोर्टाला कॉलेजियमने सर्वांच्या अनुमतीने सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस केली होती. यानंतर ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजियमने कृपाल सौरभ यांचं नाव शिफारस करण्याला मंजूरी दिली. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा पुनर्विचार करण्यासाठी पाठवलं.

.

कॉलिजियमच्या म्हणण्यानुसार, सौरभ कृपाल यांच्याजवळ क्षमता, बुद्धी असे सर्व गुण आहेत. कॉलिजियमने २०१७ साली कृपाल यांचं नाव सुचविण्यात आले. मात्र, सरकारने कृपाल यांची दिल्ली हायकोर्टाची न्यायाधीश बनवण्याची प्रक्रिया थांबवली आहे.

सौरभ यांची त्यांच्या समलैंगिकतेमुळे त्यांना दिल्ली न्यायाधीश बनवले जात नाही. त्यांच्या नावाला सरकारने हिरवा कंदील दिला तर, सौरभ कृपाल हे पहिले समलैंगिक न्यायाधीश होऊ शकतात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

SCROLL FOR NEXT