SBI Recruitment 2022  Saam TV
देश विदेश

Job Alert: भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी; 'या' पदासाठी आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : सुशिक्षित बेरोजगारांसाठी भारतीय स्टेट बँकेत (SBI) नोकरीची (Job) संधी चालून आली आहे. भारतीय स्टेट बँकेने चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनेल, चॅनेल मॅनेजर सुपरवायजर एनीटाइम चॅनेल आणि सपोर्ट ऑफिसर - एनीटाइमस चॅनेल्स या पदांच्या नोकरीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांना स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी १८ मे रोजी म्हणजे आजपासून या अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (SBI Recruitment 2022 News In Marathi )

हे देखील पाहा -

देशातील सुशिक्षित तरुण-तरुणींना स्टेट बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. बँकेने काही पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. भारतीय स्टेट बँकेची ही नोकरभरती एकूण ६४१ पदांसाठी आहे.

स्टेट बँकेची नोकरीसाठीच्या महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - १८ मे २०२२

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - ७ जून २०२२

स्टेट बँकेत 'या' पदांसाठी भरती

चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनेल - ५०३

चॅनेल मॅनेजर सुपरवायजर एनीटाइम चॅनेल - १३०

सपोर्ट ऑफिसर - एनीटाइमस चॅनेल्स - ८

स्टेट बँकेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेची माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नोकरीच्या पदांसाठी 'हे' असेल वेतन

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल (सीएमएफ-एसी) – रु.३६,०००/- प्रति महिना रिपोर्टिंग अथॉरिटी :- चॅनल मॅनेजर सुपरवायजर (सीएमएस)

चॅनल मॅनेजर सुपरवायजर एनीटाइम चॅनल (सीएमएस-एसी) – रु.४१,०००/- प्रति महिना रिपोर्टिंग अथॉरिटी :-एजीएम (एसी) नेटवर्क

सपोर्ट ऑफिसर- एनीटाइम चैनल्स (एसओ-एसी) – रु. ४१,०००/- प्रति महिना रिपोर्टिंग अथॉरिटी:-एजीएम (एसी) नेटवर्क

स्टेट बँक भरती २०२२ साठी आयुमर्यादा

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना वयाची मर्यादा ही ६० वर्ष आहे.

स्टेट बँक भरती २०२२ 'अशी' असेल निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्टिंग

मुलाखत

मेरिट लिस्ट

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT