देश विदेश

Crime News: 'मला माझ्या बायकोपासून वाचवा' नवऱ्याची पोलिसांना विनंती

बायको आपणाला वेळेवर जेवण देत नाही आणि काही बोलल्यास हुंडा कायदाखाली केस करण्याची धमकी देते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिंड : पतीकडून पत्नीचा छळ केल्याची प्रकरणे आपण TV आणि वर्तमानपत्रात रोजच वाचत पाहत असतो, मात्र याउलट भिंडमध्ये एका पत्नीने पतीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळेलेल्या पतीने स्वत: महिला सेलच्या DSP समोर हजर होऊन पत्नीच्या छळापासून वाचवण्याची विनंती केली आहे.

बायको वेळेवर जेवण देत नाही

भिंडमधील पुरा येथे राहणार्‍या मनोज कुमारची पत्नी सोनम गेल्या दोन वर्षांपासून त्याला सतत त्रास देत आहे. पत्नी सतत त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ (Physical and mental Abuse) करत असल्याचा आरोप मनोजने केला आहे. तसंच ती आपणाला वेळेवर जेवण देत नाही आणि काही बोलल्यास हुंडा कायदाखाली केस करण्याची धमकी देते. तसंच ती सतत फोनवर बोलत असते आणि तिला बोलण्यास विरोध केला तर ती स्वत:ला काहीतरी करुन घेण्याची धमकी देत असल्याचही मनोजने सांगितलं.

दरम्यान, बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या मनोज कुमारने आपल्य़ा सासरच्या मंडळींकडे तिची तक्रार केली. मात्र सासरचे लोकही त्याचे ऐकत नाहीत. बरौली पोलीस ठाण्यात जाऊनही त्यांनी अनेकवेळा आपली कैफियत मांडली, मात्र तेथेही त्यांची सुनावणी झाली नाही, त्यानंतर नाराज होऊन त्यांनी महिला ठाण्याच्या DSP पूनम थापा यांच्याकडे येऊन लेखी विनंती केली की, त्यांनी स्वत:च्या पत्नीला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून बायकोच्या त्रासापासून वाचवा अशी विनंतीही केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT