Sanjay Raut Saam Tv
देश विदेश

राज-गडकरी भेट: राऊत म्हणतात...रात गई बात गई!

मुंबई महानगर पालिका शिवसेनाच जिंकणार काळ्या दगडावरची रेघ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरा भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजपा-मनसे युतीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान यावर आता संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा -

ते म्हणाले की, अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो. प्रत्येक भेटीमागे काही तरी राजकारण असतं असं नाही. दरम्यान युतीच्या शक्यतेबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, त्याविषयी फार काही बोलावं अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका शिवसेना ताकदीने लढेल. मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कितीही असंतृष्ट आत्मे एकत्र आले, मराठी माणसं, मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कितीही कटकारस्थानं केली तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचली तरी काही आम्हाला फरक पडत नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; ठाकरे सेनेची अचानक एन्ट्री

Rashmika Mandanna : "छोटा विरोश येतोय..."; महिन्याभरातच रश्मिका-विजयने दिली गुडन्यूज, 'त्या' VIDEO नं रंगली चर्चा

Malti Chahar Hot Photos: भर उन्हात मालती चहरचा कुल अंदाज; हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार, अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

SCROLL FOR NEXT