बिपीन रावत यांच्या मृत्यूबद्दल संजय राऊतांनी व्यक्त केली शंका Saam TV
देश विदेश

बिपीन रावत यांच्या मृत्यूबद्दल संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपलं मत मांडलं आहे. ते दिल्लीत बोलत होते.

वृत्तसंस्था

सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash)निधन झालं. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे. लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या एवढ्या तंत्रज्ञानाने भरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये निधन झाल्यामुळे अनेक लोक शंका उपस्थीत करत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपलं मत मांडलं आहे. ते दिल्लीत बोलत होते.

सध्या चीन सोबत तणावाची परिस्थिती आहे, पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा कुरापती सुरू आहेत, अशा वेळी देशाच्या सेनापतीचा मृत्यू होतो, त्यामुळे लोकांच्या मनात नक्कीच शंका आहे. अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरातून हा घातपात असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबद्दल बोलताना राऊत यांनी 1952 मध्ये घडलेली जुनी घटना सांगितली.

पुढे तो बोलताना संजय राऊत म्हणाले 1952 साली पुंछ भागात लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं विमान कोसळलं होतं, त्यामध्ये लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी होते. तेव्हापासून हवाई प्रवासात अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगावी आणि एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी एकत्र प्रवास करु नये अशा सुचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. तसेच हा मुद्दा जर संसदेत चर्चेत आला तर लोकांच्या मनातील प्रश्न आम्ही विचारू असंही राऊत यांनी सांगितलं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT