Sanjay Raut Delimitation Bill Latest News : संसदेच्या संभाव्य डीलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) बिलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. मतदारसंघ पुनर्रचना हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी खासदारांना तब्बल १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली.
अद्याप संसदेचे हिवाळी अधिवेशन का घेतले जात नाही, असा आरोप संजय राऊत यांनी उपस्थित केला. डीलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी पडेल ती किंमत मोजून पक्ष फोडण्याची आणि खासदार विकत घेण्याची रणनीती आखली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा सर्व प्रकार नियमबाह्य आणि संविधानाच्या विरोधात असल्याची टीकाही यावेळी राऊत यांनी केला. या दाव्यावर छगन भुजबळ आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राऊतांवर पलटवार केला आहे.
डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना आणि आमदारा-खासदारांना लक्ष्य केले जात आहे. शिवसेना पक्षातील काही नेत्यांवरही असाच प्रयोग झाल्याचे राऊत म्हणाले. पूर्वी आमदारांना ५० कोटी रुपये देऊन फोडलं. २०२९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या बिलासाठी आता १५० कोटी रुपयांचा दर चालत असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला.
मुंबईतून पैसा जात असल्याचा दावा
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यांवरूनही राऊत यांनी निशाणा साधला. महाराष्ट्रात दुष्काळाशी लढण्यासाठी निधी नसताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पैसा फिरवला जात असल्याचा दावा राऊत यांनी केला. एसआरए (SRA) प्रकल्प, नगर विकास खाते आणि इतर माध्यमांतून निधी वळवला जात आहे. त्यातूनच राजकीय गणिते आणि निवडणुकांची आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. काही मंत्र्यांनी ही जबाबदारी घेतल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
"पुरावे असतील तर द्या"
डिलिमिटेशनवरून खासदारांना १५० कोटींचे आमिष दाखवले जात असल्याच्या राऊतांच्या विधानावर छगन भुजबळ यांनी थेट पुराव्याची मागणी केली आहे. अशा प्रकारचे दावे करण्यात काहीही अर्थ नाही. संजय राऊत यांच्याकडे ठोस पुरावे असल्यास त्यांनी ते समोर आणावेत, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
प्रताप सरनाईकांचा टोला
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांच्या टीकेची प्रवृत्ती आणि कोट्यवधींच्या आकड्यांवरून जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांवर टीका करण्याची सवयच राऊतांनी लावून घेतली असल्याचे सरनाईक म्हणाले. कोणाला १५० कोटी, कोणाला ५० कोटी तर कोणाला १०० कोटी मिळाले, असे सांगत राऊत जणू काही 'RBI चे गव्हर्नर' असल्यासारखे वागतात, असा टोला त्यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.