Russia Ukraine War: गेल्या १० दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. अनेक देश आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी रशियावर बंधनं लादली आहेत. दरम्यान, आता अॅप्पल (Apple) नंतर सॅमसंगने एक मोठा निर्णय घेतला आहे. सॅमसंगने (Samsung) रशियातील सर्व प्रोडक्टच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
हे देखील पहा -
सॅमसंग कंपनी सतत परिस्थितीवर नजर ठेवतील आणि त्यानंतरच ते त्यांचे पुढील पाऊल उचलतील. सॅमसंगने केवळ स्मार्टफोनचा पुरवठाच बंद केला नाही तर चिप, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या इतर प्रोडक्टचा पुरवठा देखील बंद करणार आहे. ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल दिला आहे. सॅमसंगच्या या निर्णयामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे. आता सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्याचे उत्पादन रशियामध्ये उपलब्ध होणार नाही.
सॅमसंगचे हे पाऊल नवीन नाही. याआधीही अनेक टेक कंपन्यांनी रशियामध्ये आपली सेवा बंद केली आहे. अॅप्पलनेही काही दिवसांपूर्वी रशियातील आपली सेवा बंद करत असल्याची घोषणा केली होती. तसेच गुगलनेही रशियाला मोठा धक्का दिला आहे. गुगलने रशियामध्ये आपल्या अनेक सेवा बंद केल्या आहेत. कंपनीने अनेक रशियन अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. गुगलने युट्यूबवर रशियन मीडियाशी संबंधित चॅनेलही ब्लॉक केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.