बीड हादरलं! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंडेंच्या परळीत चाललंय काय ? खुनाच्या घटनेपाठोपाठ बलात्काराच्या घटनेने खळबळ
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - म्हशीला चारापाणी टाकण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर, गावातीलचं नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या (Beed) परळी (Parali) तालुक्यात असणाऱ्या नागापूरमध्ये घडली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी, शेतात म्हशीच्या वासराला चारापाणी करत असताना तिघेजण तिच्या जवळ आले. त्यापैकी दोघेजण तिथुन निघून गेले व एक जण तिथेच थांबला.

हे देखील पहा -

यावेळी त्याने " तू मला आवडते म्हणत बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध केले ". त्याचबरोबर हे कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. या आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. याप्रकरणी आरोपी अंकुश गायके याच्यावर, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed News
Video: अक्षय कुमारने मुलांसोबत सजवली बाग, ट्विंकलने शेअर केला व्हिडिओ

दरम्यान, गत पाच सहा दिवसांपूर्वीच खुनाच्या घटनेने परळी तालुका हादरला होता. बहीण-भावाच्या हत्याकांडानंतर, पुन्हा एका सावकाराने पैशाच्या देवाण-घेवाणीवरून महिलेचा खून केला आणि त्यानंतर आता 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानं, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंडेंच्या परळीत नेमकं चाललय काय ? कायदा आणि सुव्यवस्थेचा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या परळीतच बोजवारा उडत असेल, तर जिल्ह्यातील इतर ठिकाणची परिस्थिती कधी आटोक्यात येणार ? असा सवाल बीडकरांमधून उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com