SAMajWADI PARTY FIRST CANDIDATE LIST 2027 saam tv
देश विदेश

निवडणुकीआधी विरोधी पक्षाचा मोठा डाव! उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Samajwadi Party First Candidate List For UP Assembly Elections 2027: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी समाजवादी पक्षाने 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अखिलेश यादव यांनी उमेदवारांची नावे जाहीर करत काँग्रेससोबत 26 जागांवरील जागावाटप चर्चा पूर्ण झाल्याची माहिती दिली.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 च्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाने 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत सहारनपूर, बेहट, कैराना, अमरोहा आणि ललितपूर या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान कॉँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही चर्चा सुरू असून, आतापर्यंत 26 जागांवर चर्चा पूर्ण झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाने सहारनपूरमधील बेहट विधानसभा मतदारसंघातून उमर अली खान यांना उमेदवारी दिली आहे. तर सहारनपूर विधानसभा मतदारसंघातून आशु मलिक यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. कैराना मतदारसंघातून नाहिद हसन, अमरोहा मतदारसंघातून महबूब अली, तर ललितपूर विधानसभा मतदारसंघातून ज्योती लोधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 'एक्स'वर ट्विट करत काँग्रेससोबतच्या जागावाटपाबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसच्या टीमने प्राधान्यक्रमानुसार पाठवलेल्या जागांपैकी 26 जागांवर चर्चा पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच उर्वरित संभाव्य जागांची यादीही काँग्रेसकडून मागवण्यात आली आहे.

दोन्ही पक्ष एकत्र बसून कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल, यावर चर्चा करणार आहेत. आपल्या सर्वेक्षणाच्या आणि विजयाच्या समीकरणांच्या आधारे काँग्रेसने विचार न केलेल्या काही जागांबाबतही समाजवादी पक्ष सूचना देऊ शकतो, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उमेदवारांना केवळ काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून नव्हे, तर 'इंडिया आघाडी'चे उमेदवार म्हणून उतरवण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच उमेदवारांना 'पीडीए'चे उमेदवार म्हणून पुढे आणण्याची भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झिशान सिद्धक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार

आइस्क्रीमचं आमिष अन् ५ लाखांची खंडणी! १२ वर्षीय मुलासोबत काय घडलं?

Wednesday Horoscope: बुधवार ठरणार खास! या ५ राशींना मिळणार मोठी आनंदाची बातमी; महादेवाची विशेष कृपा

मळमळ, उलट्या, अतिसाराचा त्रास; शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू, महापालिकेकडून दुकानावर कारवाई

CJP निवडणूक लढवणार? युपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT