Cipla Medicine Company Saam Tv
देश विदेश

Cipla Medicine Company: पाश्चात्य देशांना स्पर्धा देणारी देशी औषध कंपनी 'सिप्ला' जाणार इंग्रजांच्या हाती, कुटुंबात कोणी नाही सांभाळायला

साम टिव्ही ब्युरो

Cipla Medicine Company: जगभरात प्रसिद्ध असलेली आणि पाश्चात्य देशांना कडवी स्पर्धा देणारी देशी औषध कंपनी 'सिप्ला' (The Chemical Industrial And Pharmaceutical Laboratories) लवकरच इंग्रजांच्या हाती जाणार आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी फार्मा कंपनी असलेल्या सिप्लाचे 1.2 लाख कोटींची मार्केट कॅप आहे. मात्र आता ही कंपनी विकली जाणार आहे.

जगातील सर्वात मोठी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, ब्लॅकस्टोनने एलपी (लिमिटेड पार्टनर्स) सोबत सिप्लामधील संपूर्ण हिस्सा विकत घेण्यासाठी नॉन-बाइंडिंग बोली लावली आहे. असं असलं तरी अद्यापही कंपनी विकली गेलेली नाही.

देशातली सर्वात जुनी औषध कंपनी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्वाजा हमीद यांचे कुटुंब कंपनीतील त्यांचे संपूर्ण 33.47 टक्के हिस्सा विकणार आहे. सिप्ला ही देशातील सर्वात जुनी औषध कंपनी आहे, जी नफ्यापेक्षा औषधाची किंमत कमी ठेवण्यावर भर देते. या कंपनीला गरिबांची औषध कंपनीही म्हटले जाते. पण आता ही कंपनी विकली जाणार आहे. या कंपनी स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच 1935 मध्ये सुरू झाली होती. या कंपनीचा व्यवहार ब्लॅकस्टोनशी झाला, तर या कंपनीची धुरा भारतीयाच्या हातातून निघून परदेशी व्यक्तीच्या हातात जाईल. (Latest Marathi News)

कंपनी विकण्याचं कारण काय?

देशातील इतकी जुनी औषध कंपनी, जी नफ्यात सुरू असूनही का विकली जात आहे? असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ख्वाजा अब्दुल हमीद यांनी 1935 मध्ये ही कंपनी सुरू केली होती. 1972 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीची धुरा युसूफ हमीद यांच्याकडे सोपवण्यात आली. युसूफ हमीद हे 87 वर्षांचे आहेत.

युसूफ हमीद (अध्यक्ष) आणि एमके हमीद (उपाध्यक्ष) दोघेही दुसऱ्या पिढीतील आहेत आणि दोघेही जुने आहेत. या कारणास्तव 2015 मध्ये त्यांनी सिप्लाच्या संचालक मंडळावर आपली भाची समीना हमील यांचा समावेश केला. समिना हमीद या हमीद कुटुंबाची तिसरी पिढी आहे आणि सध्या त्या कंपनी सांभाळत आहेत.

समीना या कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत. समीना हमीद या कुटुंबातील तिसर्‍या पिढीतील एकमेव सदस्य आहेत, ज्या कंपनी सांभाळत आहेत. म्हणजेच कंपनी सांभाळणारे या कुटुंबात दुसरे कोणी नाही. अशा परिस्थिती सिप्ला कंपनीच्या नेतृत्वासाठी स्पष्ट रोडमॅपची गरज हमीद कुटुंबाला वाटते. मात्र सिप्ला कंपनीच्या नेतृत्वाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चिंतेचा विषय आहे. कंपनीला नेतृत्व मिळावे यासाठी हमीद कुटुंब कंपनीतील त्यांचे संपूर्ण हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. ही बातमी समोर आल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार होत आहेत.

कशी झाली कंपनीची सुरुवात?

असे कमीच लोक असतील ज्यांना सिप्ला या औषध कंपनीचे नाव माहित नसेल. ख्वाजा हमीद हे त्याकाळी जर्मनीत केमिस्ट म्हणून काम करत होते. जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांनी पाहिले की देशातील मोठी लोकसंख्या अशी आहे जे आपल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे महागडी औषधे खरेदी करू शकत नाही. गरिबांसाठी औषध बनवण्याचा निर्णय त्यांनी त्याच वेळी घेतला. यानंतर त्यांनी 1935 मध्ये सिप्ला कंपनी सुरू केली. त्यांच्या या पावलाचे कौतुक महात्मा गांधी ते पंडित नेहरू आणि नेताजी सुभाष यांनीही केले होते. ख्वाजा हमीद यांनी स्वस्त आणि देशी औषधे विदेशी कंपन्यांना स्पर्धा देऊ लागले.

भारतात जेनेरिक औषधांची सुरुवात सिप्लानेच केली होती. पुढे 1972 मध्ये सिप्लाने हृदयरोगावरील उपचारासाठी Propranolo या औषधाचे जेनेरिक व्हर्जन तयार केले. सिप्लाच्या या दाव्यानंतर इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज या ब्रिटीश कंपनीने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.

यानंतर युसूफ हमीद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. ते इंदिरा गांधी यांना म्हणाले, कोट्यवधी भारतीयांना जीवनरक्षक औषध मिळू नये का? कारण आपल्या लोकांना ते औषध बनवणारे आवडत नाहीत'', असे विचारले. यानंतर भारत सरकारने पेटंट कायद्यात बदल केला. सिप्लाच्या या पावलामुळे देशात स्वस्त आणि जेनेरिक औषधांचा मार्ग खुला झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT