Group Sexual Assault In UP Saam TV
देश विदेश

UP Crime: गर्भवती महिलेवर सलग ४ दिवस चौघांकडून सामुहिक बलात्कार; पीडितेने आपबीती सांगितल्यावर पोलिसही झाले स्तब्ध

Saharanpur Crime News : मला जाऊ द्या माझ्या पोटात दोन महिन्यांचे बाळ आहे. मला त्रास देऊ नका अशी बराच वेळ विनवणी महिलेने केली, मात्र आरोपींनी काहीही ऐकलं नाही.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

लखनऊ: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फर्रुखाबाद जिल्ह्यातील बसस्थानकातून चार तरुणांनी एका गर्भवती महिलेचे अपहरण करून तिला बंधक बनवले आणि तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार (Group Sexual Assault) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही महिला दोन महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी पीडितेने आरोपीच्या तावडीतून सुटून फारुखाबादमधील राजेपूर येथील बहादूरपूर गावात पोहोचून गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर ग्रामस्थांनी राजेपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेला हरदोईच्या मुर्चा कात्री गावात घेऊन गेले, जिथे या गर्भवती महिलेला डांबून ठेवण्यात आले होते. (Sexual assault on pregnant women in UP)

हे देखील पाहा -

पीडित महिलेने सांगितले की, माझे सासर सहारनपूरमध्ये असून मामा बरेली येथे आहेत. १६ ऑगस्टला तिने बरेलीहून सहारनपूरला जाण्यासाठी बस पकडली आणि फर्रुखाबादला पोहोचली. येथून सहारनपूरला जाण्यासाठी ती बसस्थानकावर दुसऱ्या बसची वाट पाहू लागली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही तरुण जवळ येऊन उभे राहिले. त्यानंतर मग काय झाले मला माहीत नाही. माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला एका बंद खोलीत दिसले असं या महिलेचं म्हणनं आहे. (Gangrape of pregnant women)

पुढे महिलेने सांगितलं की, एका बाजूला पेंढा ठेवला होता, तर दुसरीकडे मला रिकाम्या जागेवर बसवलं होतं. खोली आतून बंद होती. माझ्या समोर चार जण बसले होते. मी बोलताच चौघांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मला जाऊ द्या माझ्या पोटात दोन महिन्यांचे बाळ आहे. मला त्रास देऊ नका अशी बराच वेळ विनवणी महिलेने केली मात्र, येथून उठल्यास जीवे मारून टाकू, अशी धमकी पीडितेला चौघांनी दिली.

यानंतर एका तरुणाने महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला शुद्धीवर आली तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली होती. खोलीला कुलूप होते, तिने आरडाओरडा केला, त्यानंतर पुन्हा सर्व आरोपींनी तिला धमकावून गप्प केले. पीडितेने सांगितले की, चार तरुणांनी मिळून माझ्यावर सामुहिक बलात्कार केली आणि मी विनवणी करत राहिले. पण त्यांनी काहीही ऐकलं नाही. या तीन दिवसांत सदर महिला भुकेने आणि तहानने पडून होती आणि सुटका होण्याची आशाही मावळली होती.

महिलेच्या म्हणण्यानुसार तीन दिवस उलटून गेले होते. चौथ्या दिवशी सर्व आरोपी झोपले होते, मात्र खोलीचे कुलूप उघडे होते. तेव्हा ती अलगद दार उघडून ती बाहेर आली आणि गावाकडे धावू लागली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. सुमारे १२ किमी धावत ती एका गावात पोहोचली आणि तिने आपल्यासोबत घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला.

बहादूरपूर गावातील लोकांनी सांगितले की, जेव्हा पीडिता आली तेव्हा ती घाबरलेली गेली होती. तिला काही नीट आठवत नव्हते. ती खूप घाबरली होती. पीडितेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राजेपूर पोलिसांना माहिती दिली. राजेपूरचे एसएचओ दिनेश कुमार गौतम गावात पोहोचले आणि पीडितेची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी पीडितेला हरदोईच्या मुर्चा कात्री गावातील घरी नेले, जिथे पीडितेच्या म्हणण्यानुसाप तिली डांबून ठेवल्याचे सांगितले होते. घटनास्थळी एक महिला आढळून आली. चौकशीत महिलेने पोलिसांना सांगितले की, मुलीची मावशी, काका आणि काकू तिला चार दिवसांपूर्वी ८० हजार घेऊन येथे सोडून गेले होते. पोलिसांनी गँगरेप आणि पीडितेच्या विक्रीच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे.

फरुखाबादचे एसपी अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, महिलेने तिला डांबून ठेवून बलात्काराचा आरोप केला आहे. प्राथमिक तपासात पीडितेली तिची मावशी, काका आणि काकूने विकल्याचे समोर येत आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. घटनास्थळी सापडलेल्या महिलेचीही चौकशी करण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT