BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकांसाठी फडणवीस देणार कानमंत्र; भाजपचा 'लक्ष्य २०२२ मुंबई ध्येयपूर्ती' मेळावा

Mumbai Election News : या मेळाव्यापासूनच मुंबईत भाजपकडून बीएमसी निवडणुकीसाठी प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे.
BJP Mission BMC 2022
BJP Mission BMC 2022Saam TV
Published On

मुंबई: राज्याची सत्ता हातात घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही (BMC) सत्ता मिळवण्यासाठी भाजपने (BJP) तयारी सुरु केली आहे. मुंबईत आज भाजपचा लक्ष्य २०२२ मुंबई ध्येयपूर्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचाराची सुरुवात आजच्या मेळाव्यापासून होऊ शकते. विशेष म्हणजे आमदार आशिष शेलार यांची नुकतीच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. (BJP Mumbai Latest News)

हे देखील पाहा -

मुंबई भाजपने मिशन बीएमसी 2022 डोळ्यासमोर ठेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. आज 20 ऑगस्टला मुंबई भाजपने एका कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला 'लक्ष्य 2022 मुंबई ध्येयपूर्ती" असे नाव देण्यात आले आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार नवनियुक्त कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मुंलुंड येथील षण्मुखानंद सभागृह येथे आयोजत करण्यात आला आहे. या मेळाव्यापासूनच मुंबईत भाजपकडून बीएमसी निवडणुकीसाठी प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे यंदाची बीएमसी निवडणुक ही शिवसेनेसाठी तारेवरची कसरत करणारी ठरेल. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने भाजपची ताकद वाढली असून मुंबईत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कसून प्रयत्न करत आहे

BJP Mission BMC 2022
Pune: शाळेत निघालेल्या दोन विद्यार्थीनींचा कंटेनरच्या धडकेत दुर्देवी मृत्यू; चालक फरार

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत, शिवसेना ९३ जागा, भाजप ८२ जागा, काँग्रेस ३१ जागा, रा.काँग्रेस ९ जागा, मनसे १ जागा, सपा ६ जागा, एमआयएम २ जागा आणि अपक्ष ६ जागा असं समीकरण होतं. भाजपने मागच्या निवडणुकीत ८२ जागा जिंकत शिवसेनेला चांगलाच धक्का दिला होता. महापौर शिवसेनेचा झाला असला तरी भाजपने शिवसेनेला आपली महात्वाकांक्षा दाखून दिली. त्यामुळे यंदा आपली सत्ता टिकवण्यासाचं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com