दिवाळीत कुटुंबावर दुख:चा डोंगर, विषारी दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू  Saam Tv
देश विदेश

दिवाळीत कुटुंबावर दुख:चा डोंगर, विषारी दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू

संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह मोठ्या थाटात असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : संपूर्ण देशात दिवाळीचा Diwali उत्साह मोठ्या थाटात असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गावातील ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना बिहार मधील बेतिया Bihar या ठिकाणी घडली आहे. ऐन दिवाळीमध्ये घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा प्रमाणात डोंगर कोसळला आहे. ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

बेतिया या ठिकाणी एकाचवेळी ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषारु दारु प्यायल्याने या ८ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होती. बेतिया या ठिकाणी काही जणांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले होते.

यानंतर अनेकांची प्रकृती बिघडू लागली आहे. आणि यातच ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. ही घटना नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्षिणेकडील तेलहुआ या गावात घडली आहे. मृतकांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक २, ३ आणि ४ मधील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गावात या सर्वांनी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर रात्री उशीरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली होती. यावेळी त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच रुग्णालयात एक- एक करुन मृत्यू होई लागले आहेत. मृतकांची नावे समोर आली असून, त्यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहनर सहनी, उमा साह, रमेश सहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT