S Jaishankar On POK  
देश विदेश

S Jaishankar: कोणाच्या तरी चुकीमुळे काश्मीरचा भाग गमावला; परराष्ट्रमंत्र्यांनी नेहरूंवर साधला निशाणा

Bharat Jadhav

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताच्या ताब्यात दिल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर निशाणा साधला. कोणाच्या तरी कमजोरीमुळे किंवा चुकीमुळे आपल्याला काश्मीरचा एक भाग गमवावा लागल्याचं परराष्ट्र मंत्री म्हणाले होते. दरम्यान जयशंकर यांना 'विश्वबंधु भारत' नावाच्या कार्यक्रमादरम्यान पीओके संदर्भात प्रश्न करण्यात आला होता.

भारताने लक्ष्मणरेषा ओलांडून पीओके भारताशी जोडल्यास चीनकडून संभाव्य प्रतिक्रिया काय असेल? अशा प्रश्न केला गेला होता. दरम्यान चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तानमधून जात आहे. त्यापार्श्वभूमीवरून हा प्रश्न केला गेला आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या कार्यांना लक्ष्मण रेषेच्या संकल्पनेत बसवून नये असं म्हटलं. “मला वाटत नाही की 'लक्ष्मण रेषा' असे काही. पीओके हा भारताचा एक भाग आहे आणि कोणाच्या तरी कमजोरीमुळे किंवा चुकीमुळे तो आपल्यापासून तात्पुरता काढून घेतला गेल्याचं, एस जयशंकर म्हणाले. “मी चीनमध्ये राजदूत होतो. त्यामुळे चीनच्या भूतकाळातील कृती आणि पाकिस्तानसोबत चीन काम करत असल्याचं आपल्या सर्वांना माहिती असल्याचंही जयशंकर म्हणालेत.

पीओकेला जुना इतिहास आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगितले की, ही भूमी पाकिस्तान किंवा चीनची नाही. त्यावर चीन आपला दावा करतो. जर कोणी सार्वभौम दावेदार असेल तर तो भारत आहे. तुम्ही कब्जा करत आहात, तुम्ही तिथे बांधकाम करत आहात, पण कायदेशीर मालकी आमची आहे, असं परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

१९९३ मधील पाकिस्तान-चीन सीमा करार

यावेळी बोलताना जयशंकर यांनी बीजिंग आणि इस्लामाबाद यांच्यातील १९६३ च्या सीमा कराराकडेही लक्ष वेधले. त्या करारामध्ये पाकिस्तानने सुमारे ५००० किलोमीटरची जमीन चीनला दिली होती. पाकिस्तान आणि चीनने आपली मैत्री आणखी वाढवण्यासाठी १९६३ मध्ये पाकिस्तानने चीनला आपल्या ताब्यातील सुमारे ५००० किमीचा भाग चीनला दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT