Russian Teacher Saam
देश विदेश

Crime: खळबळजनक! 'ओठांवर किस, प्रायव्हेट पार्टवर हात अन् न्यूड...', शिक्षिकेकडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचं शोषण

Teacher Arrested for physical Abusing Student: २७ वर्षीय विवाहित शिक्षिकेला ११ वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी ठरवून ९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

रशियातील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित महिला शिक्षिकेने आपल्याच वर्गातील ११ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले आहे. शिक्षिकेने आधी विद्यार्थ्याला आपले नग्न अवस्थेतील फोटो पाठवले. नंतर त्याला स्तनांना स्पर्श आणि ओठांवर चुंबन घेण्यास भाग पाडले. पीडित मुलाच्या आई - वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षिकेने सर्व आरोप कबुल केले. तिला अटक करण्यात आली असून, ९ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

द न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अॅना प्लाक्स्युक असे आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. विद्यार्थी तिचे कौतुक करायचा म्हणून आरोपी त्याच्यावर भाळली. हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढू लागला. तिने मुलाच्या व्हॉट्सअॅपवर तिचे नग्न अवस्थेतील फोटो शेअर केले. नंतर तिने विद्यार्थ्याला स्तनांना स्पर्श करण्यास सांगितले. तसेच चुंबन घेण्यास भाग पाडले. व्हॉट्सअॅपवरील चॅट्स पीडित मुलाच्या आईने पाहिलं. त्यांनतर तिला संताप अनावर झाला.

पीडित मुलाच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी थेट शाळा गाठली आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. या प्रकणानंतर शिक्षिकेला यासंदर्भात विचारल्यानंतर तिने आरोप मान्य केले. तसेच विद्यार्थ्याने कौतुक केल्यामुळे आकर्षित झाल्याचे तिने सांगितलं.

या प्रकरणी पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, १४ वर्षांच्याखालील मुलावर लैंगिक शोषण केल्याबद्दल तिला ९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षिकेला अटक करण्यात आली असून, तुरूंगातून सुटल्यानंतर तिला १ वर्ष कोणत्याही शालेय संस्थेत शिकवण्याची परवानगी नसणार आहे. या घटनेमुळे पालकवर्गाला धक्का बसला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT