Vladimir Putin Saam Tv
देश विदेश

Vladimir Putin : '४१ वर्षाची गर्लफ्रेंड अन् २ मुले...', रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची सिक्रेट स्टोरी; अहवालातून धक्कादायक खुलासा

Russian President Vladimir Putin girlfriend alina kabaevahas : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा खूप चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र ते त्यांच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची फिटनेसमुळे जगभरात चर्चा होत असते. दरम्यान पुतीन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एका रशियन वेबसाइटनं मोठा दावा केलाय. वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांची गर्लफ्रेंड अलिना काबाएवासोबत दोन मुले आहेत.

वेबसाईटने केलेल्या दाव्यामध्ये म्हटलंय की, पुतिनची कथित गर्लफ्रेंड माजी ऑलिम्पिक जिमनॅस्ट अलिना काबाएवा (Russian President Vladimir Putin) आहेत. त्यांना ९ आणि ५ वर्षांचे दोन मुलं आहेत. डॉसियर सेंटरच्या हवाल्याने फोर्ब्सच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आलीय. ही मुलं अत्यंत सुरक्षित निवासस्थानामध्ये आहेत, असं सांगण्यात आलंय. ही मुलं मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर गुप्तपणे आयुष्य जगत असल्याचा दावा केला गेलाय.

दोन्ही मुलांची नावं काय ?

व्लादिमीर पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना काबाएवाच्या दोन्ही मुलांना अतिशय सुरक्षित निवासस्थानी ठेवण्यात (Putin News) आलंय. तेथे कडक सुरक्षा व्यवस्था असून याबाबत पूर्णत: गुप्तता पाळली गेलीय.

डॉसियर सेंटरने दिलेल्या माहितीनुसार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि काबाएवा यांनी २००८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढली होती. पुतिन यांनी त्यांची पहिली पत्नी ल्युडमिलासोबत घटस्फोट (Russian President Vladimir Putin) होण्याआधी सहा वर्षांपूर्वी काबाएवाला डेट करण्यास सुरुवात केली होती. ४१ वर्षीय काबाएवाने स्वित्झर्लंडच्या लुगानो येथील प्रसूती केंद्रामध्ये पहिला मुलगा इव्हानला जन्म दिला होता, तर तिचा दुसरा मुलगा व्लादिमीर जूनियरचा जन्म मॉस्कोमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही मुलं कुठे राहतात?

इव्हान आणि व्लादिमीर ज्युनियर मॉस्कोच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या पुतिनच्या हवेलीत राहत असल्याची माहिती समोर आलीय. या दोन्ही मुलांचा त्यांच्या वयाच्या इतर मुलांशी कोणताही संबंध येत (Putin girlfriend alina kabaevahas) नाही. डॉसियर सेंटरच्या अहवालामध्ये दावा करण्यात आलाय की, दोन्ही मुले संगीताचे धडे घेत आहेत. तर एक वैयक्तिक प्रशिक्षक त्यांना पोहण्याचे आणि जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण देतोय. इव्हान वडिलांसोबत अनेकदा हॉकीचे सामने खेळत असल्याची देखील माहिती मिळतेय.

मागील वर्षी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गर्लफ्रेंड अलिना काबाएवा आणि दोन्ही मुलांसाठी मोठी मालमत्ता विकत घेतल्याचा दावा देखील अहवालात करण्यात आलाय. पुतिन यांनी १९८३ मध्ये ल्युडमिलासोबत लग्न केलं होतं. पुतिन यांना ल्युडमिलापासून मारिया आणि कॅटरिना या दोन मुली आहेत. त्यांचं वय ३९ आणि ३८ वर्ष असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT